Photo | X
क्रीडा

भारतीय महिला फुटबॉल संघ प्रथमच आशियाई चषकासाठी पात्र

भारतीय महिला फुटबॉल संघ २०२६मध्ये होणाऱ्या एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. २०२७च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी ही स्पर्धा पात्रतेच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतीय महिला फुटबॉल संघ २०२६मध्ये होणाऱ्या एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. २०२७च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी ही स्पर्धा पात्रतेच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे.

भारताने पात्रता फेरीतील ब-गटात सलग चार सामने जिंकून अग्रस्थान काबिज केले. थायलंड, इराक, मोंगोलिया व टिमोर या देशांना भारताने नमवले. त्यामुळे आता आशियाई चषक स्पर्धेतही भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे.

एकीकडे मानोलो मार्क्वेझ यांनी भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय फुटबॉल संघ फिफा विश्वचषकाला पात्र ठरण्यापासून फार दूर आहे. तसेच सुनील छेत्री निवृत्त झाल्यानंतर भारताची अवस्था आणखी बिकट झाली आहे. मात्र महिला संघाने पात्रतेच्या जवळ मजल मारली आहे. त्यामुळे भारतीय महिला संघ २०२७च्या विश्वचषकास पात्र ठरू शकतो.

BEST ला जाहिरातींचा आधार; दोन वर्षांत ११४.१३ कोटींचा महसूल जमा

एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ; चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

Mumbai : हरित क्षेत्रातील सुविधांसाठी मोजा पैसे! कोस्टल रोड प्रकल्पातील ७० हेक्टर हरितक्षेत्र रिलायन्स फाऊंडेशन विकसित करणार

हा आठवडा निर्णायक! शेअर बाजाराची नेमकी दिशा ठरणार; सोने-चांदी दराची कसोटी लागणार

मुंबईत तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस