पैलवान अमन सेहरावतची कांस्यला गवसणी  Canva
क्रीडा

Aman Sehrawat : कुस्तीत भारताच्या पदकांचं खातं उघडलं, पैलवान अमन सेहरावतची कांस्यला गवसणी

अमन हा ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकवून देणारा सातवा कुस्तीपटू ठरला आहे.

Pooja Pawar

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावं पदक मिळालं असून मेन्स फ्रीस्टाईलच्या ५७ किलो वजनी गटात पैलवान अमन सेहरावत याने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे. ९ ऑगस्ट रोजी अमनने कांस्य पदकाच्या लढतीत प्यूर्टो रिको के डेरियन टोई क्रूजला १३- ५ या फरकाने हरवले. यासह अमन हा ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकवून देणारा सातवा कुस्तीपटू ठरला आहे.

भारताने आतापर्यंत किती पदकं जिंकली :

भारताने आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एकूण ६ पदक जिंकली आहेत. यात पाच कांस्य तर एक रौप्य पदकाचा समावेश आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत कुस्ती विभागातून एकही पदक जिंकला आले नव्हते. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटही तिच्या अतिरिक्त वजनामुळे अंतिम फेरीपूर्वी अपात्र ठरली त्यामुळे भारताचे कुस्तीतील एक पदक हुकले. मात्र अमन सेहरावतने कुस्ती विभागातील ही कमी भरून काढत कांस्य पदक पटकावले.

अमन सेहरावतने अशी दिली झुंज :

अमनने गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या फेरीपासूनच दणक्यात सुरुवात केली होती. अमनने पहिल्या फेरीत नॉर्थ मॅसेडोनियाच्या व्लॅदिमिर इगोरोव याला १०- ० अशी मात देत विजय मिळवला. पहिल्या पिरियडमध्ये अमनने आक्रमक होत व्लॅदिमिर विरुद्ध ६ पॉईंट्स कमावले मग दुसऱ्या पिरियडमध्ये ४ पॉईंट्स मिळवले. यानंतर झालेल्या क्वाटर फायनलमध्ये अमनने अल्बानियाचा खेळाडू अबाकरोवला १२ - ० ने पराभूत केले. या दमदार परफॉर्मन्सनंतर अमनने सेमी फायनलमध्ये धडक दिली मात्र यात त्याला अपयश आले. सेमी फायनलमध्ये अमनचा सामना जगातील नंबर एक क्रमांकाचा जपाननी पैलवान रेइ हिगु सोबत होता. हिगुचीने अमनला १० - ० ने हरवले. त्यामुळे अमन सेहरावतची फायनलमध्ये जाण्याची आशा मावळली.

२२ सप्टेंबरपासून नवे GST दर लागू; कोणत्या वस्तू स्वस्त, तर कोणत्या राहणार स्थिर? वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवी झळाळी घेऊन येतेय 'मोनोरेल'; पाहा काय आहेत नवे बदल?

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे