Twitter
क्रीडा

Olympics 2036 : २०३६ च्या ऑलिम्पिकसाठी भारताची दावेदारी; ‘आयओसी’ ला स्वारस्य पत्र पाठवले

ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाच्या आयोजनासाठीच्या शर्यतीत उतरण्यासाठी लागणारे स्वारस्य पत्र भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या यजमान समितीला पाठवण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : एकाही ऑलिम्पिकमध्ये अद्याप पदकांचा दुहेरी आकडा न ओलांडलेल्या भारताने आता थेट ऑलिम्पिक आयोजनाच्या शर्यतीत दावेदारी केली आहे. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाच्या आयोजनासाठीच्या शर्यतीत उतरण्यासाठी लागणारे स्वारस्य पत्र भारताकडून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या यजमान समितीला पाठवण्यात आले आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने हे पत्र १ ऑक्टोबर रोजी पाठवले आहे, असे क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. गेल्या वर्षीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला देश २०३६च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी उत्सुक आहे, असे भाष्य केले होते. जगातून उत्सुक असलेल्या देशांमधून जर भारताची निवड करण्यात आली, तर ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी अहमदाबाद या शहराला पसंती देण्यात येणार आहे.

२०३६ च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्सच्या यजमानपदासाठी भारताने अधिकृतपणे बोली लावली आहे. भविष्यातील यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला औपचारिक पत्रही पाठवले आहे. या पत्रात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने, २०३६ मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात भारताचे स्वारस्य असल्याचे कळवले आहे. जगातील खेळांचा कुंभमेळा समजल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी जगभरातील अनेक देश उत्सुक असतात. २०३६च्या यजमानपदासाठी भारतासमोर सौदी अरेबिया, कतार, तुर्की यासारख्या अनेक देशांचे आव्हान असणार आहे. आता यजमानपदासाठी लागणाऱ्या विविध प्रक्रियेतून स्वारस्य देशांना जावे लागणार आहे. त्यानंतर सरतेशेवटी यजमानपदाची घोषणा करण्यात येणार आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत