@JioCinema/ X
क्रीडा

तू खरी फायटर! ८-१ ने आघाडीवर असताना दुखापत झाली; निशा दहिया जिंकलेली मॅच हारली, अश्रू अनावर

Swapnil S

पॅरिस : ८-१ अशी आघाडी असताना हाताला झालेल्या दुखापतीमुळे सोमवारी भारताची कुस्तीपटू निशा दहियाला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. दक्षिण कोरियाच्या पाक सोल गूमने निशावर १०-८ अशी सरशी साधली. लढतीनंतर निशा डावा हात पकडून मॅटवरच रडू लागली.

भारताच्या कुस्ती अभियानाला सोमवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी महिलांच्या ६८ किलो वजनी गटात निशाने दमदार सुरुवात करताना उपउपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या सोव्हा रिझकोवर ६-४ अशी मात केली. मग उपांत्यपूर्व लढतीत पहिल्या तीन मिनिटांतच निशाने ८-१ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात निशाच्या उजव्या हाताला दुखापत झाली. असह्य वेदना झाल्याने निशाला दोन वेळा वैद्यांनी तपासले.

त्यानंतरही निशाने खेळ सुरू ठेवला. मात्र याचाच लाभ घेत प्रतिस्पर्धी कोलने निशाच्या हातावर दडपण टाकले व अखेरच्या मिनिटात तीन वेळा तिची पकड करून फिरकी घेत ६ गुण वसूल केले. त्यामुळे दोघांमध्येही १० सेकंद असताना ८-८ अशी बरोबरी होती. त्यावेळी कोलने हरयाणाच्या निशाला पुन्हा गुडघ्यांवर आणत दोन गुण मिळवले व विजय पक्का केला. पराभव झाल्याचे समजताच निशाला रडू कोसळणे अवघड झाले. तसेच ती हाताला पकडून रडू लागली. रेपेचेज फेरीद्वारे निशाला किमान कांस्यपदकासाठी दावेदारी पेश करण्याची संधी आहे. सोशल मीडियावर निशाचे पराभवानंतरचे फोटो-व्हिडिओ व्हायरल झाले असून, 'तू खरी फायटर' अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. जखमी असूनही अखेरच्या क्षणापर्यंत तिने झुंज दिल्यामुळे कौतुकाची थाप देखील देत आहेत.

कुस्तीत भारताचे शिलेदार कोण?

भारतीय कुस्तीपटूंकडे यंदा सर्वांचे लक्ष लागून आहे. २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत रवी कुमार दहिया व बजरंग पुनिया यांनी पदके पटकावली होती. यंदा ते दोघेही पात्र ठरू शकलेले नाहीत. मात्र ५० किलो वजनी गटात विनेश फोगट व ५३ किलो वजनी गटात अंतिम पंघाल यांच्याकडून पदक अपेक्षित आहे. विनेश मंगळवारी तिचा उपउपांत्यपूर्व सामना खेळणार आहे. पुरुषांमध्ये अमन सेहरावत एकटाच भारतीय कुस्तीपटू यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेला आहे.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला