क्रीडा

दिल्लीचा धुव्वा उडवून कोलकाता अग्रस्थानी

सलग दुसऱ्या सामन्यात षटकांची गती संथ राखल्याबद्दल दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. नियमानुसार पहिल्यांदा असे घडले तर कर्णधाराला १२ लाख, दुसऱ्या वेळेस २४ लाखांचा दंड आकारण्यात येतो.

Swapnil S

विशाखापट्टणम : फलंदाजांनी केलेल्या आतषबाजीनंतर गोलंदाजांनीही अपेक्षित कामगिरी केली. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्सने बुधवारी रात्री आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा १०६ धावांनी धुव्वा उडवला. सलग तिसऱ्या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत अग्रस्थान काबिज केले. तर दिल्लीची चार सामन्यांतील तिसऱ्या पराभवामुळे नवव्या स्थानी घसरण झाली.

प्रथम फलंदाजी करताना सुनील नरिन (३९ चेंडूंत ८५) आणि मुंबईकर अंक्रिश रघुवंशी (२७ चेंडूंत ५४) यांच्या धडाकेबाज अर्धशतकांमुळे कोलकाताने २० षटकांत तब्बल ७ बाद २७२ धावांचा डोंगर उभारला. तसेच आंद्रे रसेलने १९ चेंडूंत ४१ धावा फटकावल्या. आयपीएलच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. काही दिवसांपूर्वीच हैदराबादने मुंबईविरुद्ध २७७ ही धावसंख्या रचली होती.

त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सला कोलकाताने १७,२ षटकांत १६६ धावांतच गुंडाळले. कर्णधार ऋषभ पंत (२५ चेंडूंत ५५) आणि ट्रिस्टन स्टब्स (३२ चेंडूंत ५४) यांनी अर्धशतकी झुंज देऊनही दिल्लीला २०० धावांचा पल्लाही गाठता आला नाही. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने दोन, तर वैभव अरोरा आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. सलामीवीर नरिन सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

पंतला पुन्हा एकदा दंड

सलग दुसऱ्या सामन्यात षटकांची गती संथ राखल्याबद्दल दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतला २४ लाखांचा दंड ठोठावण्यात आला. नियमानुसार पहिल्यांदा असे घडले तर कर्णधाराला १२ लाख, दुसऱ्या वेळेस २४ लाखांचा दंड आकारण्यात येतो. त्याशिवाय संघातील अन्य खेळाडूंनासुद्धा सामन्याच्या मानधनापैकी २५ टक्के दंड ठोठावण्यात येतो. किंवा त्यांना ६ लाख रुपयेही भरावे लागू शकतात. कोलकाताविरुद्ध दिल्लीने निर्धारीत वेळेत ३ षटके कमी टाकली. आता तिसऱ्या वेळेस असे घडले, तर पंतवर एका सामन्याची बंदी येऊ शकते. त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजांना याची खबरदारी घ्यावी लागेल.

आयपीएल गुणतालिका

संघ - सामने - जय - पराजय - गुण - धावगती

  • कोलकाता - ३ - ३ - ० - ६ - २.५१८

  • राजस्थान - ३ - ३ - ० - ६ - १.२४९

  • चेन्नई - ३ - २ - १ - ४ - ०.९७६

  • लखनऊ -३ - २ - १ - ४ - ०.४८३

  • गुजरात - ३ - २ - १ - ४ -०.७३८

  • हैदराबाद - ३ - १ - २ - २ - ०.२०४

  • पंजाब - ३ - १ - २ - २ - ०.३३७

  • बंगळुरू - ४ - १ - ३ - २ - ०.८७६

  • दिल्ली - ४ - १ - ३ - २ - १.३४७

  • मुंबई - ३ - ० - ३ - ० -१.४२३

(कोलकाता वि. दिल्ली सामन्यापर्यंत)

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास