क्रीडा

गुजरातला नमवण्यात लखनऊला यश

Swapnil S

लखनऊ : विदर्भाचा वेगवान गोलंदाज यश ठाकूरने (३० धावांत ५ बळी) केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर लखनऊ सुपर जायंट्सने रविवारी रात्री आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा ३३ धावांनी पराभव केला. लखनऊचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय ठरल्याने त्यांनी गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले, तर गुजरातला पाच लढतींमध्ये तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

श्री अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मार्कस स्टोइनिसच्या ४३ चेंडूंतील ५८ धावांमुळे लखनऊने २० षटकांत ५ बाद १६३ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार के. एल. राहुल (३३) आणि निकोलस पूरन (२२ चेंडूंत नाबाद ३२) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा संघ १८.५ षटकांत १३० धावांतच गारद झाला.

शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पॉवरप्लेमध्ये ५४ धावांची सलामी दिली. मात्र यशने गिलला (१९) बाद केले आणि गुजरातचा डाव घसरला. मयांक यादवच्या मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे तो एक षटक टाकून माघारी परतला. मात्र यशने जबाबदारी उचलताना विजय शंकर (१७), राहुल तेवतिया (३०), रशिद खान (०) असे महत्त्वाची बळी मिळवले. त्याला डावखुरा फिरकीपटू कृणाल पंड्याने तीन गडी टिपून उत्तम साथ दिली. केन विल्यम्सन (१), सुदर्शन (३१) यांचे अपयश गुजरातला महागात पडले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल