दुखापतीमुळे जेमिमा रॉड्रिग्ज 'द हंड्रेड' मालिकेतून बाहेर 
क्रीडा

दुखापतीमुळे जेमिमा रॉड्रिग्ज 'द हंड्रेड' मालिकेतून बाहेर

भारताची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे 'हॅमस्ट्रिंग' सध्या सुरू असलेल्या 'द हंड्रेड' या क्रिकेट मालिकेतून बाहेर पडली आहे. 'सदर्न ब्रेव्ह' संघाकडून खेळताना झालेल्या या दुखापतीमुळे आगामी 'महिला टी-२० आशिया चषक' स्पर्धेतील तिच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: भारताची स्टार फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे 'हॅमस्ट्रिंग' सध्या सुरू असलेल्या 'द हंड्रेड' या क्रिकेट मालिकेतून बाहेर पडली आहे. 'सदर्न ब्रेव्ह' संघाकडून खेळताना झालेल्या या दुखापतीमुळे आगामी 'महिला टी-२० आशिया चषक' स्पर्धेतील तिच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सदर्न ब्रेव्ह संघाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांसाठी जेमिमाच्या जागी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू चार्ली नॉट हिचा संघात समावेश करण्यात आला आहे. जेमिमा रॉड्रिग्जला झालेल्या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यांसाठी चार्ली नॉटला करारबद्ध करण्यात आल्याची आम्ही पुष्टी करतो. जेमिमा लवकर बरी व्हावी यासाठी शुभेच्छा, असे सदर्न ब्रेव्ह संघाने 'एक्स'वर स्पष्ट केले.

२५ वर्षीय जेमिमाने या मोसमात सदर्न ब्रेव्ह संघासाठी सहा डावांत ३५.७५ च्या सरासरीने आणि १३१.१९ च्या स्ट्राइक रेटने १४३ धावा केल्या आहेत. यात नाबाद ४२ धावा ही तिची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी राहिली. महिला टी-२० आशिया चषक स्पर्धेला २८ ऑगस्टपासून सुरुवात होत असून, भारतीय संघ ३० ऑगस्ट रोजी थायलंडविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या स्पर्धेसाठी तंदुरुस्त होण्यासाठी जेमिमाकडे आता तीन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे.

जेमिमा रॉड्रिग्जची अनुपस्थिती भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. रॉड्रिग्जच्या दुखापतीचे गांभीर्य अद्याप स्पष्ट झालेले नाही. भविष्याचा विचार करून तिची दुखापत अधिक गंभीर होऊ नये आणि तंदुरुस्ती कायम राहावी, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तिने माघार घेतली असण्याची शक्यता आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान