क्रीडा

जॉनी बेअरस्टोनचे दोन्ही डावात नाबाद शतक, कसोटी सामन्यात विक्रम रचला

दुसऱ्या डावात ठोकलेले शतक हे बेअरस्टोच्या कसोटी कारकिर्दीतील १२ वे आणि २०२२ मधील सहावे शतक ठरले.

वृत्तसंस्था

गेल्या वर्षीच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पुनर्नियोजित पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात दुसऱ्या डावात यजमान इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने नाबाद शतक (११४) झळकावून इतिहास रचला. या कसोटीतील बेअरस्टोचे हे दुसरे शतक ठरले. पहिल्या डावातही त्याने १०६ धावा केल्या होत्या. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावून त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

दुसऱ्या डावात ठोकलेले शतक हे बेअरस्टोच्या कसोटी कारकिर्दीतील १२ वे आणि २०२२ मधील सहावे शतक ठरले. एवढेच नाही तर गेल्या तीन कसोटी सामन्यांतील शेवटच्या पाच डावांमधील हे त्याचे चौथे शतक ठरले.

याशिवाय, एजबस्टन कसोटीतील चौथ्या दिवशी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार डावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो इंग्लंड ११वा खेळाडू ठरला. याआधी, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत बेअरस्टोने धडाकेबाज शतकी खेळी केल्या होत्या. दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात आणि तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने शतक झळकविले होते.

२०२२ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बेअरस्टो पहिल्या स्थानावर असून यावर्षी त्याने आठ कसोटी सामन्यांतील १६ डावांमध्ये ९८० धावा फटकाविल्या आहेत. त्यात सहा शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

रस्त्यावर व न्यायालयात ओबीसींची लढाई लढणार! मंत्री छगन भुजबळ यांचा निर्धार

HC पाठोपाठ SC कडूनही अनिलकुमार पवार यांना दिलासा; ED ला फटकारले

छत्तीसगडमध्ये २१० नक्षलवाद्यांची शरणागती; संविधान हातात घेत पोलिसांसमोर शस्त्रे ठेवली

अखेर स्वदेशी बनावटीचे 'तेजस एमके-१ ए' आकाशात झेपावले; भारतीय वायुसेनेत अधिकृतपणे दाखल

गुजरात मंत्रिमंडळात १९ नवे चेहरे; २६ मंत्र्यांना शपथ, उपमुख्यमंत्रीपदी हर्ष संघवी