मुंबई: वारंवार सूचना देऊनही दैनंदिन कारभार सांभाळण्यासाठी निवडून आलेली कार्यकारिणी स्थापन करण्यात अपयश आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने आल्याने भारतीय करती (आयकेएफ) भारतीय कबड्डी महासंघाला (एकेएफआय) निलंबित केले आहे. राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असताना महासंघावरच निलंबनाचा बडगा उगारला गेला आहे.
या निर्णयामुळे हमखास यश मिळवून देणाऱ्या कबड्डीच्या कुठल्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होऊ शकणार नाही. आंतरराष्ट्रीय महासंघाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईस 'एकेएफआय'च्या वरिष्ठ सूत्राने दुजोरा दिला. 'एकेएफआय' ची निवडणूक डिसेंबर २०२३ मध्ये झाली होती. या निवडणुकीत विभोर जैन अध्यक्षपदी, तर जितेंद्र प्राणसिंह सरचिटणीस म्हणून निवडून आले. मात्र, ही निवडणूक क्रीडा आचारसंहितेनुसार झाली नसल्याचा आरोप करून विरोधी गटाने नवडणुकीला न्यायालयात आव्हान दिले. यावर अद्याप सुनावणी सुरू आहे. "सर्व प्र प्रक्रिया नियुक्त निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखालीच पार पडली असताना, ती आचारसंहितेनुसार झाली नाही, असे कसे म्हणता येऊ शकते," असा युक्तिवाद आहे.
'एकेएफआय' चा "याबाबत कबड्डी महासंघावरील शासननियुक्त निवृत्त न्यायाधीश एस. पी. गर्ग यांना निवडणुकीबाबत न्यायालयात अहवाल द्यावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये आयएएस अधिकारी सनत कौल यांच्या जागी प्रशासक म्हणून गर्ग यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून गर्गच 'एकेएफआय'चा कार्यभार सांभाळत आहेत.