कॅगिसो रबाडा जायबंदी; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर (Photo-X)
क्रीडा

कॅगिसो रबाडा जायबंदी; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.

Swapnil S

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.

९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी तंदुरुस्त होण्यासाठी तो आता वेळेशी शर्यत करीत आहे. २४ सप्टेंबरपासून डर्बनमध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार असून तिसरा सामना ३० सप्टेंबर रोजी पॉचेफस्ट्रूम येथे खेळवला जाईल.

‘क्रिकेट दक्षिण आफ्रिका’ (सीएसए) वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली रबाडाच्या पुनर्वसनाची सुरुवातीची प्रक्रिया पार पडत आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने दुखापतीचे नेमके स्वरूप स्पष्ट केले नसले तरी रबाडा किमान पुढील साडेचार आठवडे मैदानाबाहेर राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नामिबियातील त्रिस्तरीय टी-२० मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या संघातही त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.

कसोटी मालिकेतील त्याचा सहभाग पुनर्वसनाच्या प्रगतीवर अवलंबून असेल आणि मालिकेच्या जवळ निर्णय घेतला जाईल, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. दुसऱ्या बाजूला, नामिबियात सुरू असलेल्या त्रिस्तरीय मालिकेत दक्षिण आफ्रिकेने नामिबियाविरुद्धच्या पहिल्या पराभवानंतर जोरदार पुनरागमन केले आहे. शनिवारी विंडहोक येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने २० षटकांत ८ बाद १४४ धावा केल्या होत्या. ब्रायन बेनेट (३४) आणि बेन करन (२४) यांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर दुआन जानसेन (३/४५) आणि प्रेनेलन सुब्रायेन (२/२७) यांनी मध्यक्रमाला खिंडार पाडले. प्रत्युत्तरादखल डेवाल्ड ब्रेव्हिसच्या अवघ्या ३२ चेंडूंत ७५ धावांच्या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य १३.४ षटकांत सहज पूर्ण केले. ब्रेव्हिसने ७ चौकार आणि ६ षटकार मारले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्रात भाजप रुजवण्यात एकनाथ खडसेंचे मोठे योगदान; राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे प्रतिपादन

Mumbai : डीआरआयची आंतरराष्ट्रीय सोने तस्करांच्या टोळीवर मोठी कारवाई; १०.७५ कोटींचे सोने जप्त, सहा जणांना अटक

गेटवे-मांडवा जलवाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; AIPA ची सुरक्षित जलवाहतुकीची मागणी

समृद्धी महामार्गालगत CNG पाइपलाईनला गळती; धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांचा भार

भारतीय मानक वेळ अनिवार्य करणारे नियम सरकारकडून जारी; अंमलबजावणीसाठी १८० दिवसांची मुदत