क्रीडा

महाराष्ट्राची पदकांची शंभरी पूर्ण; कुस्ती, जलतरण आणि नेमबाजीत रविवारी एकूण १२ पदके

महाराष्ट्राच्या साईराज परदेशी याने अतिशय आत्मविश्वासाने कामगिरी करत मुलांच्या ८१ किलो गटात राष्ट्रीय विक्रम नोंदवित सोनेरी पदक जिंकले.

Swapnil S

चेन्नई : खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूनी रविवारी आपली क्षमता दाखवताना जलतरण, कुस्ती, नेमबाजी या खेळांत पदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणमध्ये ७, कुस्तीमध्ये ४, तर नेमबाजीमध्ये १ अशी १२ पदके जिंकताना पदकांची शंभरी ओलांडली. महाराष्ट्र पदकतक्त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर असून हरयाणा आणि तामिळनाडू यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी लढत सुरू आहे.

मुलींच्या १०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत आदिती हेगडे हिने सुवर्णपदक जिंकून यंदाच्या या स्पर्धेतील पदकांची हॅट‌्ट्रिक पूर्ण केली. तिने ही शर्यत एक मिनिट ४.७८ सेकंदात पूर्ण केली. तिने रविवारी महाराष्ट्राला ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिले शर्यतीतही सुवर्णपदक मिळवून दिले. तिने दिवा पंजाबी, राघवी रामानुजन, अलीफिया धनसुरा यांच्या साथीने सुवर्णपदक पटकाविताना चार मिनिटे ८.६१ सेकंद वेळ नोंदवली.

मुलांच्या गटात श्लोक खोपडे याने २०० मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले. ही शर्यत त्याने दोन मिनिटे २५.०४ सेकंदात पार केली. ऋषभ दास याने महाराष्ट्रासाठी आणखी एक पदकाची नोंद करताना शंभर मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत कांस्यपदक पटकाविले.

साईराज परदेशीचा राष्ट्रीय विक्रम

महाराष्ट्राच्या साईराज परदेशी याने अतिशय आत्मविश्वासाने कामगिरी करत मुलांच्या ८१ किलो गटात राष्ट्रीय विक्रम नोंदवित सोनेरी पदक जिंकले. मात्र महाराष्ट्राच्या भूमिका मोहिते हिला वेटलिफ्टिंगमधील ५९ किलो वजनी गटात सोनेरी यश साधता आले नाही.‌ तिला रौप्यपदक मिळाले. साईराज याने स्नॅच प्रकारामध्ये १२४ तर क्लिन व जर्कमध्ये १६२ किलो असे एकूण २८६ किलो वजन उचलले. क्लीन व जर्कमध्ये त्याने मध्यप्रदेशचा खेळाडू अजय बाबू याने गतवर्षी नोंदविलेला १६१ किलो हा राष्ट्रीय विक्रम मोडला.

छत्तीसगड : सुरक्षा दलांवर मोठे हल्ले घडवणारा कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा ठार; सरकारने ५ कोटींचे ठेवले होते बक्षीस

आधार कार्ड नागरिकत्वाचा नव्हे फक्त ओळखीचा पुरावा; ECI चा सुप्रीम कोर्टात पुनरुच्चार

Mumbai : आज दुपारपर्यंत CNG पुरवठा होणार सुरळीत; MGL ने केले जाहीर

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर गुन्हा दाखल; चित्रपट करण्याच्या बहाण्याने डॉक्टरांचे ३० कोटी हडपल्याचा आरोप

लाडक्या बहिणींना दिलासा! ई-केवायसीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ