क्रीडा

श्रीकांतचा अंतिम फेरीत प्रवेश; जपानच्या युशी तनाकाला नमवले, सहा वर्षांत प्रथमच पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये

भारताच्या किदाम्बी श्रीकांतने जपानच्या युशी तनाकाला पराभवाचे पाणी पाजत मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने सहा वर्षांत प्रथमच पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Swapnil S

क्वालालंपूर : भारताच्या किदाम्बी श्रीकांतने जपानच्या युशी तनाकाला पराभवाचे पाणी पाजत मलेशिया मास्टर्स सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने सहा वर्षांत प्रथमच पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

३२ वर्षीय श्रीकांतने जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानी असलेल्या तनाकाला २१-१८, २४-२२ असे पराभूत केले. अंतिम फेरीत श्रीकांतचा सामना चीनच्या ली शी फेंगविरुद्ध रविवारी होणार आहे.

२०१९ ला इंडिया ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावल्यानंतर श्रीकांतने प्रथमच बीडब्ल्यूएफ जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. फॉर्म आणि फिटनेसमुळे जागतिक क्रमवारीत ६५व्या स्थानी असलेल्या श्रीकांतसाठी गेले काही हंगाम निराशाजनक राहिले आहेत.

पहिल्या गेममध्ये तनाकाविरुद्ध खेळताना श्रीकांतने काही चुका केल्या. तो १-५ असा पिछाडीवर होता. त्यानंतर अप्रतिम स्ट्रेट स्लाईस आणि हँड स्मॅशेस मारत भारतीय खेळाडूने पिछाडी भरून काढली. त्यानंतर श्रीकांतने १४-१४ अशी बरोबरी साधली आणि अप्रतिम क्रॉस-कोर्ट रिटर्नसह १९-१६ अशी आघाडी घेत गेम खिशात घातला. दुसऱ्या गेममध्ये तनाकाने पुन्हा चांगली सुरुवात केली. श्रीकांतने काही चुका केल्या. त्यामुळे तनाका ७-२ असा आघाडीवर होता. पण पहिल्या गेमसारखाच खेळ उंचावत श्रीकांतने अंतर कमी करत पुन्हा बरोबरी साधली. त्यानंतर श्रीकांतने १३-१० अशी आघाडी घेतली होती. पण तनाकाने पुनरागमन करत १७-१७ अशी बरोबरी साधली. अखेर श्रीकांतने याही गेममध्ये बाजी मारत सामना आपल्या बाजूने वळवला.

या विजयामुळे मी आनंदी झालो आहे. अलीकडच्या काळात मी प्रचंड मेहनत घेतली आहे. मोठ्या कालावधीनंतर मला हे यश मिळवता आले आहे. त्यामुळे मी भावुक झालो आहे. - किदाम्बी श्रीकांत

उद्याची TET रद्द; पेपरफुटीच्या संशयावरून राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, भिवंडीत तिघांना अटक

फुकट प्रवासाला नकार दिल्याने रिक्षाचालकाला शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच होमगार्डला कामावरून काढले

५२ वर्षांनंतर सलमान खान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? मुंबईत समुद्रकिनारी सहा मजली नव्या घराची तयारी

"संघाबद्दल आपुलकी असेल तर ती मनात ठेवा नाहीतर..."; विश्वास नांगरे पाटलांवर राज ठाकरे संतापले

अचानक झाडाची फांदी डोक्यावर पडल्याने दुचाकीस्वार कोमात, घटना सीसीटीव्हीत कैद