क्रीडा

पंजाबविरुद्ध डीकॉकची बॅट तळपली

Swapnil S

लखनौ : क्विंटन डीकॉकचे अर्धशतक तसेच निकोलस पूरन आणि कृणाल पंड्या यांच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे लखनौ सुपरजायंट्सने पंजाब किंग्सविरुद्ध ८ बाद १९९ धावा उभारल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपरजायंट्सने सुरुवातीलाच लोकेश राहुलला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरवले. मात्र राहुलला ९ चेंडूंत फक्त १५ धावा करता आल्या. वेगवान गोलंदाज अर्शदीपने त्याचा अडसर दूर केला. त्यापाठोपाठ देवदत्त पडिक्कल (९) यालाही मोठी खेळी करता आली नाही. मार्कस स्टॉइनिसने १९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर डीकॉकने निकोलस पूरन याच्यासह चौथ्या विकेटसाठी ४७ धावा जोडल्या. डीकॉकने ३८ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. त्यानंतर पूरनने आक्रमक फटकेबाजी करताना २१ चेंडूंत प्रत्येकी ३ चौकार-षटकारांच्या सहाय्याने ४२ धावा फटकावल्या.

अखेरच्या क्षणी कृणाल पंड्याने धुव्वाधार फलंदाजी केली. त्याने पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा पुरेपूर समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. त्याने २२ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४३ धावा फटकावल्या. त्यामुळेच लखनौला पंजाबसमोर विजयासाठी २०० धावांचे लक्ष्य ठेवता आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस