एक्स @himantabiswa
क्रीडा

मलेशिया बॅडमिंटन स्पर्धा; सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत

सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गुरुवारी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयला गाशा गुंडाळावा लागला.

Swapnil S

नवी दिल्ली : सात्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी गुरुवारी मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. मात्र पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉयला गाशा गुंडाळावा लागला.

१,००० सुपर गुणांचा दर्जा असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक-चिराग यांनी मलेशियाच्या एन अझियन आणि टॅन वीके यांना २१-१५, २१-१५ अशी धूळ चारली. त्यांनी ४३ मिनिटांत ही लढत जिंकली. आता सात्विक-चिरागपुढे यू सिग व ये टिओ या जोडीचे आव्हान असेल.

पुरुष एकेरीत चीनच्या ली शी फेंगने भारताच्या प्रणॉयला २१-८, १५-२१, २३-२१ असे तीन गेममध्ये नमवले. महिलांमध्ये मालविका बनसोड चीनच्या हॅन यूकडून १८-२१, ११-२१ अशी पराभूत झाली. महिला दुहेरीत ट्रीसा जॉली-गायत्री गोपिचंद, तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या जोड्या पराभूत झाल्या.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग