प्रतिमा : इंस्टाग्राम (Marcus Stoinis)
क्रीडा

Stoinis-Sarah Engagement Photos: स्पेनच्या समुद्रकिनारी स्टॉयनिसचा साखरपुडा; फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस याने आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरूवात केली आहे.

Krantee V. Kale

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस याने आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. स्टॉयनिसने ३ सप्टेंबर २०२५ रोजी त्याची दीर्घकाळापासूनची पार्टनर सारा झार्नुचसोबत (Sarah Czarnuch) साखरपूडा उरकला. या खास क्षणाचा खुलासा साराने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे केला.

स्पेनच्या समुद्रकिनारी एका बोटीत बसून रोमँटिक अंदाजात स्टॉयनिसने साराला प्रपोज केले. मी माझ्या आयुष्यातील सर्वात सोपा होकार दिला, असे साराने इंस्टा पोस्टमध्ये सांगितले. तसेच, दोघांचे काही खास फोटो देखील शेअर केले.

कोण आहे सारा?

सारा स्वतः एक ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि फॅशन डिझायनर असून स्टाइल आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. स्टॉयनिस आणि सारा दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करीत होते. स्टॉयनिसला पाठिंबा देण्यासाठी सारा अनेकदा स्टेडियममध्येही दिसली आहे. सोशल मीडियावरही दोघे नेहमी एकमेकांचे फोटो शेअर करायचे. स्टॉयनिस आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळतो. सारा आयपीएल सामने पाहण्यासाठी अनेक वेळा भारतात आली आहे.

दरम्यान, स्टॉयनिससाठी हे वर्ष आयुष्याला कलाटणी देणारं ठरलंय. या वर्षी फेब्रुवारीमध्येच त्याने टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. २०१५ मध्ये त्याची वनडे कारकिर्द सुरू झाली होती. मार्कस स्टॉयनिसने ७१ एकदिवसीय आणि ७४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने अनुक्रमे १४९५ आणि १२४५ धावा केल्यात. याशिवाय, एकदिवसीय सामन्यात ४८ आणि टी-२० मध्ये ४५ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. आता दोघांचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते दोघांनाही नव्या आयुष्याच्या शुभेच्छा देत आहेत.

Mumbai : ७ अभियंता, कर्मचाऱ्यांवर कारवाई; कोरोनाकाळात पत्नीच्या नावे कंत्राटे, ५० हजारांचा दंड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीची शिफारस

न्यायव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत; मुंबई उच्च न्यायालयाने हरयाणा पोलिसांना फटकारले

Mumbai : डबेवाल्यांची नवी इनिंग, क्लाऊड किचन उभारणार; जुनी सेवा अडचणीत, काळानुसार बदलण्याचा निर्णय

१०० कुटुंबांचे भवितव्य टांगणीला; बनावट मंजुऱ्या, डोंबिवलीतील बिल्डरला अखेर अटक

नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानची पुढची सुनावणी १२ जूनला