क्रीडा

मिताली राजची कामगिरी अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायक, नरेंद्र मोदींनी केले कौतुक

मितालीने या महिन्याच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती

वृत्तसंस्था

मिताली राजची कामगिरी अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात स्टार महिला क्रिकेटपटू मिताली राजचे कौतुक केले.

मितालीने या महिन्याच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. वयाच्या सोळाव्या वर्षी पदार्पण करणारी मिताली तिच्या २३ वर्षांच्या कारकीर्दीत सर्वाधिक सामने खेळणारी आणि सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी सांगितले की, मिताली केवळ एक असामान्य खेळाडूच नाही तर अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. मी मितालीला तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

मितालीने २६ जून १९९९ रोजी आयर्लंडविरुद्ध पदार्पण केल्यानंतर १२ कसोटी सामन्यांमध्ये ४३.६८च्या सरासरीने ६९९ धावा केल्या. २३२ एकदिवसीयमध्ये तिने सात हजार ८०५ धावा केल्या आणि ८९ टी-२० सामन्यांमध्ये तिने दोन हजार ३६४ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे.

मिताली राजने कर्णधार म्हणून दीर्घकाळ भारताचे नेतृत्व केले. मितालीने १५५ एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाची धुरा सांभाळली, ज्यापैकी टीमने ८९ सामने जिंकले आणि ६३ सामने गमावले. तिने आठ कसोटी सामने आणि ३२ टी-२० सामन्यांमध्येही कर्णधारपद भूषविले आहे.

Asia Cup 2025 : वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न; जेतेपदासाठी भारताची आज पाकिस्तानशी लढत

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत

CSMT स्थानकातील प्लॅटफॉर्म १८ राहणार बंद; पुनर्विकासासाठी ८० दिवस फलाट बंद; दोन एक्स्प्रेस दादरपर्यंतच चालणार

Maharashtra Heavy Rain : ठाणे, रायगडसाठी 'रेड अलर्ट'