क्रीडा

"तो जितका चांगला खेळाडू, तितकाच चांगला माणूस असता तर..." मोहम्मद शमीच्या बायकोच्या विधानाची सर्वत्र चर्चा

क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताच्या मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली

नवशक्ती Web Desk

उद्या होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होणाऱ्या विश्वचषकातील अंतीम सामन्याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताच्या मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. उद्या रंगणाऱ्या फायनलमध्ये मोहम्मद शमीच्या गोलंदाजीकडे सर्वांचं लक्ष आहे. असं असताना मोहम्मद शमीच्या बायकोने केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे.

मोहम्मद शमीची बायको हसीन जहाँने शमीवर अनेक आरोप केले आहेत. हे दोघेही सध्या वेगळं राहतात. दोघांमध्ये अनेक मतभेद झाले आहेत. हसीन जहाँने यूपी तक ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, कधी-कधी मनात हे विचार येतात, तो जितका चांगला खेळाडू असतो, तितकाच चांगला माणूस असता तर मी माझी मुलगी आम्ही आनंदी जीवन जगू शकलो असतो.

हसीन जहाँ पुझढे म्हणाल्या की, "शमीच्या लोभी आणि घाणेरड्या मनाचा आम्हाला सामना करावा लागला आहे. मात्र, सध्या जे काही समोर येत आहे. ते पैसे देऊन खऱ्या गोष्टी लपवण्याचा एक प्रयत्न आहे."

शमी सध्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. असं विचारत्यावर हसीन जहाँ म्हणाली की, हे आवश्यक नाही की तो आता क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असेल तर तो खऱ्या आयुष्यात देखील तसाच असेल. त्याची सध्या चांगली वेळ सुरु आहे. पण ही वेळ कायम राहील असं मला वाटत नाही. प्रोफेशनल आयुष्यात तो चांगली कामगिरी करत आहे. वैयक्तीक आयुष्यात त्याने खूप वाईट केलं आहे.

न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीने तब्बल सात गडी बाद करत भारताला फायनलमध्ये नेलं. रविवारी(१९ नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट वर्ल्डकप फायनल सामना रंगणार आहे. या सामन्यात मोहम्मद शमीच्या गोलंदाजीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप