क्रीडा

IPL 2023 : 'या' खेळाडूची मुंबई इंडियन्सच्या सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती

आयपीएल २०२३ (IPL 2023) लवकरच सुरु होणार असून आता प्रत्येक संघाने संघबांधणीची तयारी सुरु केली आहे

प्रतिनिधी

इंडियन प्रीमियर लीग २०२३ला (IPL 2023) लवकरच सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील चॅम्पियन समजल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा मागील हंगाम चांगला राहिला नव्हता. त्यामुळे आता या हंगामासाठी संघाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यासंदर्भातील एक महत्त्वाची बातमी म्हणजे नवीन सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी अनुभवी अरुणकुमार जगदीश यांची नियुक्ती संघाने केली आहे. १६ वर्षे भारतीय देशांतर्गत क्रिकेट खेळल्यानंतर त्यांनी कर्नाटक संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

अरुणकुमार जगदीश यांनी १९९३ ते २००८ या कालावधीत भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांनी खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली आणि कर्नाटक संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली कर्नाटक संघाने २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये रणजी ट्रॉफी, इराणी चषक आणि विजय हजारे चषकमध्ये विजेतेपद पटकावले. त्यानंतर त्यांनी २०१९-२० हंगामासाठी पुद्दुचेरीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. तर, २०२० पासून त्यांनी युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स त्यांच्या काय कमल करते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मुंबईत कोसळधार! पुढील काही तास धोक्याचे, ‘रेड अलर्ट’ जारी

मराठवाड्यात पावसाचा कहर; धाराशिव-छत्रपती संभाजीनगरमध्ये पूरस्थिती तीव्र, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले

करूर चेंगराचेंगरी : मृतांची संख्या ३९ वर; विजय थलापतींकडून २० लाखांची मदत जाहीर, तपास समिती नियुक्तीचे आदेश

ठाण्यात पावसाचा जोर कायम; सखल भागांत पाणी साचले, नवरात्र आणि गरब्यावर पावसाचे सावट

Marathwada Floods : मराठवाड्यावर पुन्हा पुरसंकट; बीड, लातूर, धाराशिवमध्ये जोरदार पाऊस, जनजीवन विस्कळीत