क्रीडा

भारताच्या 'या' तारांकित कुस्तीपटूने कोरले कांस्यपदकावर नाव

वृत्तसंस्था

भारताचा तारांकित कुस्तीपटू बजरंग पुनियाने रविवारी मध्यरात्री जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरले. जागतिक स्पर्धेत सर्वाधिक चार पदके पटकावणारा बजरंग हा भारताचा पहिला कुस्तीपटू ठरला आहे.

२८ वर्षीय बजरंगने पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटातील कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेरावर ११-९ अशी मात केली. गतवर्षी टोकयो ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक जिंकणाऱ्या बजरंगला उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन मिकाइलकडून पराभव पत्करावा लागला; परंतु मिकाइलने अंतिम फेरी गाठल्यामुळे बजरंगला रेपिचेजमधून कांस्यपदकासाठी दावेदारी पेश करण्याची संधी मिळाली.

बजरंगचे हे एकदंर तिसरे जागतिक कांस्यपदक ठरले. यापूर्वी २०१३ आणि २०१९मध्येही त्याने कांस्यपदक जिंकले होते. तर २०१८मध्ये त्याने रौप्यपदकावर मोहोर उमटवली होती. भारताचे हे यंदाच्या जागतिक स्पर्धेतील दुसरे पदक ठरले. महिलांमध्ये विनेश फोगटने काही दिवसांपूर्वी कांस्यपदकाची कमाई केली होती.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम