क्रीडा

पूरनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपटूंची अचानक निवृत्ती पत्करण्याची मालिका कायम आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळात सुरू असलेले वाद आणि जगभरातील फ्रँचायझी टी-२० स्पर्धांमध्ये खेळण्याच्या हेतूने पूरनने निवृत्ती पत्करल्याचे समजते.

Swapnil S

बार्बाडोस : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज निकोलस पूरनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेटपटूंची अचानक निवृत्ती पत्करण्याची मालिका कायम आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळात सुरू असलेले वाद आणि जगभरातील फ्रँचायझी टी-२० स्पर्धांमध्ये खेळण्याच्या हेतूने पूरनने निवृत्ती पत्करल्याचे समजते.

२९ वर्षीय पूरनने ६१ एकदिवसीय आणि १०६ टी-२० सामन्यांत विंडीजचे प्रतिनिधित्व केले. त्याने ६१ एकदिवसीय सामन्यांत ९९चा स्ट्राइक रेट व ३९च्या सरासरीने १,९८३ धावा केल्या. तसेच टी-२०मध्ये २६ची सरासरी व १३६च्या स्ट्राइक रेटने २,२७५ धावा फटकावल्या. एकदिवसीय प्रकारात पूरनने ३ शतके व ११ अर्धशतके झळकावली, तर टी-२०मध्ये त्याच्या नावावर १३ अर्धशतके आहेत. पूरन यष्टीरक्षणही करायचा.

“बराच काळ विचार केल्यावर मी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून थांबण्याची हीच वेळ आहे. वेस्ट इंडिजची जर्सी परिधान करणे माझ्यासाठी स्वप्नवत होते. विंडीजसाठी माझे प्रेम नेहमीच कायम असेल,” असे पूरन म्हणाला.

पूरनने २०१६मध्ये टी-२० प्रकारात पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले. मग तो एकदिवसीय संघाचाही भाग झाला. आयपीएलमध्ये पूरन सध्या लखनऊ संघाचा भाग आहे. एकहाती सामना जिंकवून देण्यात पूरन पटाईत आहे. २०२४ या वर्षात त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १७० षटकार लगावले होते. आता तो फक्त जगभरातील टी-२० स्पर्धांमध्ये खेळताना दिसेल.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video