(Photo - X/India_AllSports) 
क्रीडा

जागतिक बॉक्सिंग स्पर्धा : भारताची निखत उपांत्यपूर्व फेरीत; पदकापासून फक्त एक पाऊल दूर

दुहेरी जागतिक पदकविजेती भारतीय बॉक्सर निखत झरीनने मंगळवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. निखत सलग तिसऱ्या जागतिक पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

Swapnil S

लिव्हरपूल : दुहेरी जागतिक पदकविजेती भारतीय बॉक्सर निखत झरीनने मंगळवारी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. निखत सलग तिसऱ्या जागतिक पदकापासून फक्त एक पाऊल दूर आहे.

लिव्हरपूल, इंग्लंड येथे जागतिक बॉक्सिंग स्पर्धा सुरू असून यामध्ये भारताचे महिला व पुरुष बॉक्सर मिळून २० खेळाडू सहभागी झाले आहेत. यंदा नव्या प्रशासकीय समितीच्या मार्गदर्शनात बॉक्सिंगची जागतिक स्पर्धा होणार आहे. यापूर्वी आयबीए म्हणजेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या अंतर्गत स्पर्धांचे आयोजन केले जायचे. ४ ते १४ सप्टेंबर या काळात रंगणाऱ्या या स्पर्धेत ६५ देशांतील ५५० बॉक्सर्स सहभागी होणार आहेत. यामध्ये १७ खेळाडू हे पॅरिस ऑलिम्पिकमधील पदकविजेते आहेत. त्यामुळे भारताला कडवे आव्हान मिळेल.

दरम्यान, महिलांच्या ५१ किलो वजनी गटात २९ वर्षीय निखतने जपानच्या युना निशिनाकाला ५-० अशी धूळ चारली. आता निखतसमोर टर्कीच्या बुसनाज चिकिरोचे कडवे आव्हान असेल. बुसनाजही २०२२ची जागतिक पदक विजेती तसेच दोन वेळची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती आहे.

निखत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच गारद झाली होती. आता मात्र तिच्याकडून पदकाची अपेक्षा आहे. २०२२ व २०२३च्या जागतिक स्पर्धेत निखतने सुवर्ण काबिज केले होते. बॉक्सिंगमध्ये उपांत्य फेरी गाठली, तरी पदक पक्के होते. त्यामुळे आता निखतने पुढील लढत जिंकणे गरजेचे आहे. दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती लवलिना बोर्गोहैन यावेळी सलामीलाच गारद झाल्याने निखतकडून देशवासियांना पदक अपेक्षित आहे.

लक्ष्य पराभूत, अभिनाशची आगेकूच

पुरुषांच्या ८० किलो वजनी गटात भारताच्या लक्ष्य चहरला पराभवाला सामोरे जावे लागले. फ्रान्सच्या सिझरने लक्ष्यला ३-० असे पराभूत केले. अभिनाश जामवालने मात्र ६५ किलो वजनी गटात आगेकूच केली. सुमित कुंडू (५७ किलो), सचिन सिवाच (६०) व नरेंदर बेरवाल (९२) यांना मात्र आपापल्या गटात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचेही आव्हान संपुष्टात आले.

उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन घेतली राज ठाकरेंची भेट; बड्या नेत्यांच्या उपस्थितीत अडीच तास खलबतं, जागावाटपावर झाली चर्चा?

Asia Cup 2025 : भारताची आज यूएईशी सलामी! सूर्यकुमारच्या सेनेला आव्हान देण्यासाठी राजपूत यांच्या प्रशिक्षणाखाली अमिराती सज्ज

PUC नसल्यास नाही मिळणार पेट्रोल-डिझेल; "No PUC, No fuel" योजना सक्तीने राबवणार - परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

नागरिकांना लुटून तिजोरी भरू नका; न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले, स्टॅम्प ड्युटीच्या मुद्द्यावरून कानउघाडणी