क्रीडा

आता ऑलिम्पिकमध्येही खेळलं जाणार क्रिकेट ; आयओसीने केली अधिकृत घोषणा

मुंबई येथे आजोजित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अधिवेशनात क्रिकेटचा अधिकृतपणे लॉल एंजेलिस ऑलिम्पिक २०२७ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

नवशक्ती Web Desk

मुंबई येथे आजोजित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अधिवेशनात क्रिकेटचा अधिकृतपणे लॉल एंजेलिस ऑलिम्पिक २०२७ मध्ये समावेश करण्यात आला आहे. हे जवळपास शुक्रवारीच निश्चित झाले होते. कारण आंतराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारी मंडळाने शुक्रवारी आजोजन समितीच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मुंबईत झालेल्या आयओसीच्या अधिवेशनात मतदान झाले. त्यानंतर त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

थॉमस बाख यांनी मतदानानंतर सांगितलं की, दोन आयओसी सदस्यांनी प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं तर एक सदस्य अनुपस्थित राहिला. याशिवाय इतर सर्वांनी या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. यात क्रिकेटशिवाय सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, स्क्वॅश आणि लॅक्रोसचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याता आला होता.

लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आयोजन समितीने महिला आणि पुरुष गटात सहा संघाची स्पर्धा प्रस्तावित केली आहरे. युनायटेड स्टेट्स हा यजमान संघ असेल, जरी संघ आणि पात्रता प्रक्रियेबद्दल नंतरच्या तारेखला घेतला जाईल. आयओसीचे क्रीडा संचालक किट मॅककोनेल म्हणाले, सांघिक खेळात प्रत्येक इव्हेंटमध्ये सहा संघ असावेत असा प्रस्ताव आहे. मात्र, संघाची संख्या आणि पात्रता यावर अद्याप तपशीलवार चर्चा झाली केलेली नाही.यावर २००५च्या आसपास निर्णय घेतला जाईल.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

ठाकरेंचे वलय संपले का?