'आता तुझ्या नावाने लोक मला ओळखतील'; मुलाची IPL मध्ये एन्ट्री होताच पप्पू यादव यांची खास पोस्ट  
क्रीडा

'आता तुझ्या नावाने लोक मला ओळखतील'; मुलाची IPL मध्ये एन्ट्री होताच पप्पू यादव यांची खास पोस्ट

मुलाची आयपीएलमध्ये निवड झाल्यानंतर अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला.

Krantee V. Kale

बिहारच्या पूर्णिया येथील अपक्ष खासदार पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन आयपीएल २०२६ हंगामात खेळताना दिसणार आहे. मंगळवारी झालेल्या आयपीएलच्या लिलावात सार्थकला कोलकाता नाईट रायडर्सने त्याच्यासाठी ठरवलेल्या किमान किंमतीत अर्थात ३० लाखांत आपल्या ताफ्यात सामील केले. सार्थकची आयपीएलमध्ये निवड झाल्याने पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत मुलाचे अभिनंदन केले.

कोलकाताने दिली आयपीएलमध्ये संधी

सार्थक रंजन सध्या दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. अलीकडेच दिल्ली प्रीमियर लीग २०२५ मध्ये त्याने ५८ चेंडूत तुफानी शतक ठोकले होते. आयपीएल ऑक्शनमध्ये सार्थकची बेस प्राइस ३० लाख रुपये ठरवण्यात आली होती. केकेआर व्यतिरिक्त, इतर संघाने बोली न लावल्याने केकेआरने बेस प्राइसवरच त्याला संघात घेतले. सार्थक केकेआरसाठी एक स्फोटक सलामीवीर फलंदाज ठरू शकतो. दिल्लीकडून खेळताना त्याने सातत्याने चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध केले आहे.

दिल्ली ते आयपीएल...सार्थकचा क्रिकेट प्रवास

सार्थकचा जन्म २५ सप्टेंबर १९९६ रोजी झाला. सार्थक दिल्लीकडू खेळतो. त्याने २०१६ मध्ये मुश्ताक अली स्पर्धेद्वारे टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २५ फेब्रुवारी २०१७ रोजी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने दिल्लीकडून लिस्ट ए मध्ये पदार्पण केले. त्यानंतर २० नोव्हेंबर २०१८ रोजी रणजी ट्रॉफीमध्ये त्याने दिल्लीकडून प्रथम श्रेणीत पदार्पण केले. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीसाठी दोन प्रथम श्रेणी सामने, चार लिस्ट ए सामने आणि पाच टी-२० सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ९.३३ च्या सरासरीने २८ धावा केल्या आहेत. तर, लिस्ट ए मध्ये २६.२५ च्या सरासरीने १०५ धावा केल्या आहेत. तसेच, टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १३.२० च्या सरासरीने ६६ धावा केल्या आहेत.

DPL मध्येही चमकदार कामगिरी

सार्थकने दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) २०२५ मध्ये त्याचा सर्वोत्तम फॉर्म दाखवला. सलामीला खेळताना त्याने नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्ससाठी ९ सामन्यांमध्ये ४४९ धावा केल्या, ज्यामध्ये २१ षटकार आणि ४४ चौकारांचा समावेश होता. त्याने एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आणि स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

पप्पू यादव यांची मुलासाठी खास पोस्ट

मुलाची आयपीएलमध्ये निवड झाल्यानंतर अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, “अभिनंदन बेटा! मनापासून खेळ, आपल्या कर्तृत्वावर स्वतःची ओळख निर्माण कर. तुझी स्वप्ने पूर्ण कर! आता सार्थकच्या नावाने लोक मला ओळखतील.”

आयपीएलमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी

केकेआरमध्ये निवड झाल्यामुळे सार्थकसमोर आता आपल्या फलंदाजीच्या बळावर स्वतःची ओळख निर्माण करण्याची मोठी संधी आहे.आयपीएल हा त्याच्या करिअरमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, आगामी हंगामात त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर