क्रीडा

Paralympic Games Paris 2024: तिरंदाजीत शीतल-राकेश उपांत्य फेरीत

तिरंदाजीतील मिश्र सांघिक प्रकारात शीतल देवी व राकेश कुमार या जोडीने उपांत्य फेरी गाठली. त्यांनी उपांत्यपूर्व लढतीत इंडोनेशियाच्या ऑडी अयुदी व फॅरलिन केन या जोडीवर १५४-१४३ अशी मात केली.

Swapnil S

पॅरिस : तिरंदाजीतील मिश्र सांघिक प्रकारात शीतल देवी व राकेश कुमार या जोडीने उपांत्य फेरी गाठली. त्यांनी उपांत्यपूर्व लढतीत इंडोनेशियाच्या ऑडी अयुदी व फॅरलिन केन या जोडीवर १५४-१४३ अशी मात केली.

शीतल-राकेश यांना या प्रकारात अग्रमानांकन लाभले आहे. आता उपांत्य फेरीत शीतल-राकेश यांच्यासमोर फातिमा हीमती व हाडी नोरी या इराणच्या जोडीचे आव्हान असेल. पायाने लक्ष्यभेद करणाऱ्या शीतलने एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते. मात्र तेथे तिला पदक जिंकण्यात अपयश आले. त्यामुळे आता मिश्र सांघिक प्रकारात तिच्याकडून पदक अपेक्षित आहे. तिरंदाजीत भारताने एकही पदक जिंकलेले नाही.

शीतलविषयी महत्त्वाचे

  • जन्मापासूनच हात नसलेली शीतल पायाने लक्ष्यभेद करते. गेल्या वर्षी हांगझो येथे झालेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर शीतल प्रकाशझोतात आली होती.

  • त्या स्पर्धेत शीतलने दोन सुवर्णपदकांची कमाई केली होती आणि अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला पॅरा-खेळाडू ठरली होती.

  • तिने आणखी एक रौप्यपदकही पटकावले होते. आता पॅरालिम्पिकमध्येही पदक जिंकण्याचा तिचा मानस आहे.

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन