एएफपी
क्रीडा

Paris Olympics 2024 : पहिल्या दिवशी भारताचे कोणते सामने? बघा २७ जुलैचे वेळापत्रक

अवघं क्रीडा विश्व ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतं, तो दिवस अखेर उजाडला आहे. सीन नदीवर शुक्रवारी रात्री पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला.

Swapnil S

अवघं क्रीडा विश्व ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतं, तो दिवस अखेर उजाडला आहे. सीन नदीवर शुक्रवारी रात्री पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला. ऑलिम्पिकमध्ये भारताचे ११७ खेळाडू पदकांसाठी दावेदारी सादर करत आहेत. तसेच त्यांच्या सोबतीला १४० जणांचे सहाय्यक प्रशिक्षकांचे पथकही आहे. १९००मध्ये भारत सर्वप्रथम ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. यंदा भारताचे हे २६वे ऑलिम्पिक असून २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने विक्रमी ७ पदकांची कमाई केली होती. मात्र यंदा प्रथमच १० पदकांचा आकडा गाठण्याची भारताला सुवर्णसंधी आहे.

बघूया भारताचे आज पहिल्या दिवसाचे वेळापत्रक 

नेमबाजी

- १० मीटर रायफल मिश्र सांघिक

संदीप सिंग-इलाव्हेनिल वलारिवन

अर्जुन बबुता-रमिता जिंदाल

(दुपारी १२.३० वा.)

- १० मीटर पिस्तूल पुरुष एकेरी

अर्जुन चीमा, सरबजोत सिंग

(दुपारी २ वा.)

- १० मीटर पिस्तूल महिला एकेरी

मनू भाकर, रिदम सांगवान

(दुपारी ४ वा.)

रोईंग

-पुरुष एकेरी-स्कल प्रकार

पनवर बलराज

(दुपारी १२.३० वा.)

टेनिस

पुरुष दुहेरी पहिली फेरी

रोहन बोपण्णा-श्रीराम बालाजी

(दुपारी ३.३० वा.)

टेबल टेनिस

पुरुष एकेरी पहिली फेरी

हरमीत देसाई वि. झैद अबू

(सायंकाळी ७.१५ वा.)

बॅडमिंटन

पुरुष एकेरी पहिली फेरी

लक्ष्य सेन वि. केव्हिन कॉर्डन

(सायंकाळी ७ वा.)

पुरुष दुहेरी पहिली फेरी

सात्विक-चिराग वि. लुकास-रोनर

(रात्री ८ वा.)

महिला दुहेरी पहिली फेरी

अश्विनी-तनिषा वि. किम-काँग

(रात्री ११.५० वा.)

हॉकी

ब-गट साखळी सामना

भारत वि. न्यूझीलंड

(रात्री ९ वा.)

बॉक्सिंग

महिला (५४ किलो)

प्रीती पवार वि. थी किम वो

(मध्यरात्री १२.०५ वा.)

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्रातील प्रलंबित निवडणुका आधी होणे आवश्यक; सुप्रीम कोर्टाचा विशेष अनुमती याचिकेत हस्तक्षेपाला नकार

ST डेपो लीजवर देणार; ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्यासाठी टेंडर काढणार; बस डेपोचे बस पोर्टमध्ये रूपांतर होणार