क्रीडा

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत दाखल;सायनाकडून निराशा

किदम्बी श्रीकांतला बुधवारी दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. तर बी. साईप्रणित पहिल्याच फेरीत गारद झाला

वृत्तसंस्था

दिल्लीच्या ३० वर्षीय बिगरमानांकित प्रणॉयने पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व लढतीत भारताच्याच नवव्या मानांकित लक्ष्य सेनवर १७-२१, २१-१६, २१-१७ अशी पिछाडीवरून सरशी साधून तीन गेममध्ये नमवले. मूळात राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या तसेच गतवेळेस जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या २१ वर्षीय लक्ष्यचे पारडे या लढतीसाठी जड मानले जात होते. मात्र प्रणॉयने एक तास आणि १५ मिनिटांत ही लढत जिंकली. आता प्रणॉयसमोर उपांत्यपूर्व सामन्यात चीनच्या झाओ जुनपेंगचे आव्हान असेल. लक्ष्यच्या पराभवामुळे आता एकेरीत फक्त प्रणॉयवरच भारताची भिस्त आहे. किदम्बी श्रीकांतला बुधवारी दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. तर बी. साईप्रणित पहिल्याच फेरीत गारद झाला.

महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूच्या अनुपस्थितीत सायना नेहवालकडून बॅडमिंटनप्रेमींना अपेक्षा होत्या. परंतु उपउपांत्यपूर्व सामन्यात थायलंडच्या बुस्नान ओंगबारनफानने ३२ वर्षीय सायनावर २१-१७, १६-२१, २१-१३ अशी तीन गेममध्ये मात करून तिचे आव्हान संपुष्टात आणले. बुस्नानविरुद्ध सायनाचा हा आठ सामन्यांतील पाचवा पराभव ठरला.

दुहेरीत डबल धमाका

पुरुष दुहेरीत सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी तसेच ध्रुव कपिला आणि एम. आर. अर्जुन या भारतीय जोड्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सातव्या मानांकित चिराग-सात्त्विक जोडीने जेपी बे आणि लॅस मॉलिडे या डेन्मार्कच्या जोडीवर २१-१२, २१-१० असे अवघ्या ३५ मिनिटांत वर्चस्व गाजवले. तर ध्रुव-अर्जुन यांनी सिंगापूरच्या टेरी ही आणि लोह कीन यांच्यावर १८-२१, २१-१५, २१-१६ असा ५८ मिनिटांत तीन गेममध्ये विजय मिळवला. शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत ध्रुव-अर्जुनसमोर इंडोनेशियाची तिसरी मानांकित जोडी मोहम्मद अहसान आणि हेंड्रा सेटिवानचे कडवे आव्हान असेल. तर सात्त्विक-चिराग ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जपानच्या दुसऱ्या मानांकित जोडीशी दोन हात करतील.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री