क्रीडा

कोहलीला दबावाचा फटका : अनिल कुंबळे

कुंबळे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा स्वत:वर दबाव टाकत आहे. त्यामुळे त्याला चांगल्या फॉर्ममध्ये येण्यासाठी अडचण होत असल्याचे भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाले.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा स्वत:वर दबाव टाकत आहे. त्यामुळे त्याला चांगल्या फॉर्ममध्ये येण्यासाठी अडचण होत असल्याचे भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे म्हणाले.

२०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकानंतर कोहलीने सहा एकदिवसीय डावांमध्ये केवळ १३७ धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

कुंबळे पुढे म्हणाले की, रोहित बिनधास्त फलंदाजी करत आहे. कारण संघात सक्षम फलंदाज आहेत. सर्वच फलंदाज फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे विराटनेही रोहितसारखी बिनधास्त फलंदाजी करायला हवी. स्वत:वर दबाव घ्यायला नको, असे कुंबळे म्हणाले. प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत कठीण प्रसंग येतात, परंतु विराट स्वतःवर जास्त दबाव टाकत आहे, असे कुंबळे म्हणाले. त्याने दबाव झुगारून बिनधास्त फलंदाजी करावी, मग तो धावा जमवू शकेल असे कुंबळे यांना वाटते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक