क्रीडा

राधिका आवटीला तलवारबाजीत सुवर्णपदक

तलवारबाजीमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भवानीदेवीने शाननदार कामगिरी करत देशाला या खेळाची ओळख करून दिली

वृत्तसंस्था

नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या राधिका प्रकाश आवटीने तलवारबाजीत सुवर्णपदक पटकाविले. सांगलीतील राधिकाने नॅशनल गेम्समध्ये केरळकडून खेळताना स्पर्धेतील हे सलग चौथे सुवर्णपदक मिळविले.

अकिवाट (ता. शिरोळ) हे राधिकाचे मूळ गाव आहे. तिचे प्राथमिक शिक्षण कुपवाडमधील नवकृष्णा व्हॅली येथे झाले. सध्या ती केरळ येथे ‘साई’ प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे.

तलवारबाजीमध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भवानीदेवीने शाननदार कामगिरी करत देशाला या खेळाची ओळख करून दिली. त्यानंतर महाराष्ट्रातून राधिका आवटीने गेल्या दोन वर्षात चमकदार कामगिरी करत स्वतःला सिद्ध केले.

देशभरात तलवारबाजीचे प्रशिक्षण देणाऱ्या काही निवडक संस्थांमध्ये थॅलेसरच्या केंद्राचा समावेश होतो. या केंद्राची माहिती मिळाल्यानंतर राधिका आपल्या वडिलांसह या केंद्राच्या निवड चाचणीसाठी गेली. तिची निवड झाल्यानंतर तेथेच राहण्याचा तिने निर्णय घेतला. साईचे प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे तेथे सर्व सुविधा तिला उपलब्ध झाल्या.

तिने सिंगापूरमधील अंडर-१७ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भाग घेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यानंतर तिने मागे वळून पहिलेच नाही. परंतु पुढच्याच वर्षी झालेल्या स्पर्धेत फॉइल टीमकडून कांस्यपदक जिंकले. तेव्हापासून तिने पदके मिळविण्याचा सपाटाच लावला.

याआधी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे झालेल्या ३१ व्या वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत फॉइल प्रकारात तिने सुवर्णपदक पटकाविले होते. कतार (दोहा) येथील फॉइल ग्रँड प्रीक्‍स स्पर्धेसाठी आणि ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी तिची निवड झाली होती. हे तिचे सलग चौथे सुवर्णपदक ठरले.

कसून केलेल्या सरावाच्या जोरावर तिने तलवारबाजी स्पर्धेत मोठी झेप घेतली. २०२० मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्‍यपद स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावतले होते.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत