क्रीडा

ILT-20 च्या लिलावात अश्विन अनसोल्ड

आयएलटी-२० स्पर्धेच्या लिलावात भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. मात्र वाईल्ड कार्ड मार्फत त्याला संघात संधी मिळू शकते.

Swapnil S

दुबई : आयएलटी-२० स्पर्धेच्या लिलावात भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला खरेदी करण्यात कोणत्याही संघाने रस दाखवला नाही. मात्र वाईल्ड कार्ड मार्फत त्याला संघात संधी मिळू शकते.

आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर अश्विनने यूएईच्या लीग स्पर्धेत आपली नोंदणी केली आहे. आयपीएलमधून निवृत्ती स्वीकारल्यामुळे अश्विन आता जगभरातील लीग स्पर्धा खेळू शकतो.

गेल्या आठवड्यात ३९ वर्षीय अश्विनने बिग बॅश लीग स्पर्धेत सिडनी थंडरसोबत करार केला आहे. तसेच नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेत तो खेळणार असल्याचे समजते.

अश्विनने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. त्याने आजतागायत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भल्या भल्या फलंदाजांना धडकी भरवली आहे. परदेशातही भारताचा हुकमी फिरकी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीतही अश्विनने प्रभावी कामगिरी केली आहे.

पाकिस्तानची पुन्हा पोलखोल! ऑपरेशन सिंदूरमध्ये F-16 सह ४ ते ५ लढाऊ विमाने भारताने पाडली; भारतीय हवाई दल प्रमुखांचा मोठा खुलासा

पिंपरी-चिंचवड : खेळता खेळता चुकून लिफ्टमध्ये गेला अन् अडकला; ११ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

SRA चा कॉर्पस फंड १ लाख! झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव; इमारतींच्या उंचीप्रमाणे रकमेत होणार वाढ

डायग्नोस्टिक लॅब्ससाठी नवीन कायदा; चाचण्यांची अचूकता व विश्वासार्हता राखण्यासाठी सरकारचे पाऊल

...तर ओला, उबरवर कारवाई