क्रीडा

विराटसह बंगळुरूची यंदा स्वप्नपूर्ती?पहिल्यावहिल्या संस्मरणीय आयपीएल जेतेपदापासून आता एक पाऊल दूर

तारांकित फलंदाज विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वापासून आयपीएल जेतेपदापासून वंचित आहे. मात्र यंदा विराटसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तमाम चाहत्यांची स्वप्नपूर्ती होणार, असे दिसत आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने गुरुवारी पंजाब किंग्जचा ८ गडी आणि ६० चेंडू राखून धुव्वा उडवला.

Swapnil S

मुल्लानपूर : तारांकित फलंदाज विराट कोहली इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वापासून आयपीएल जेतेपदापासून वंचित आहे. मात्र यंदा विराटसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तमाम चाहत्यांची स्वप्नपूर्ती होणार, असे दिसत आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या बंगळुरूने गुरुवारी पंजाब किंग्जचा ८ गडी आणि ६० चेंडू राखून धुव्वा उडवला.

मुल्लानपूरला झालेल्या क्वालिफायर-१ सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांसमोर पंजाबच्या फलंदाजांची अक्षरश: भंबेरी उडाली. जोश हेझलवूड व सूयश शर्मा यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवून पंजाबला फक्त १०१ धावांत गुंडाळले. पंजाबचा एकही फलंदाज ३० धावांपुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर फिल सॉल्टच्या आक्रमक अर्धशतकाच्या बळावर बंगळुरूने १० षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. त्यामुळे बंगळुरूने चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी २००९, २०११, २०१६मध्ये बंगळुरूने अंतिम फेरी गाठली होती. मात्र तिन्ही वेळेस त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यावेळी मात्र बंगळुरू वेगळ्याच लयीत आहे.

“संपूर्ण हंगामात आम्ही आमच्या रणनीतीनुसार खेळ केला. त्याचेच फलित म्हणून आम्ही इथवर मजल मारली आहे. संघातील प्रत्येक खेळाडूने कोणत्या ना कोणत्या क्षणी पुढाकार घेतला आहे. चाहत्यांचा पाठिंबाही आम्हाला सातत्याने लाभला आहे. मात्र कार्य अजून संपलेले नाही. अंतिम फेरीतही कामगिरीत सातत्य राखून जेतेपद मिळवण्याला आमचे प्राधान्य असेल,” असे कर्णधार रजत पाटीदार म्हणाला.

विराटने १४ सामन्यांत ६१४ धावा केल्या आहेत. तसेच यामध्ये ८ अर्धशतकांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे यंदा विराटला अन्य फलंदाजांकडूनही पुरेशी साथ लाभत आहे. २०१६च्या आयपीएलमध्ये विराटने ९००हून अधिक धावा करत ऑरेंज कॅप पटकावली होती. मात्र तेव्हा बंगळुरूने २०१६मध्ये थोडक्यात ट्रॉफी गमावली. यंदा विराट ज्या लयीत आहे, ते पाहता तो चषक घेऊनच राहणार, हे पक्के आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’