क्रीडा

राजकीय नेत्याच्या मुलाशी गैरवर्तणूक केल्याबद्दल कर्णधारपदावरून हटवले! हनुमा विहारीचा आंध्र प्रदेशकडून न खेळण्याचा निर्णय

पुन्हा कधीच आंध्र प्रदेशकडून खेळणार नाही, असे हनुमा विहारीने सांगितले

Swapnil S

बंगळुरू : रणजी स्पर्धेत सोमवारी उपांत्यपूर्व सामन्यात आंध्र प्रदेशला मध्य प्रदेशकडून अवघ्या ४ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर ३० वर्षीय हनुमा विहारीने पुन्हा कधीच आंध्र प्रदेशकडून खेळणार नाही, असे सांगितले. संघातील एका खेळाडूशी गैरवर्तणूक केल्यामुळे त्याला हंगामाच्या सुरुवातीला एका सामन्यानंतरच कर्णधारपदावरून हटवण्यात आले. हा खेळाडू राजकीय नेत्याचा मुलगा असल्याने मला संघटनेने अशी वागणूक दिली, असा आरोप विहारीने केला आहे.

स्पर्धेच्या सुरुवातीला बंगालविरुद्धच्या सामन्यात विहारी कर्णधार होता. त्यानंतर विहारीने कर्णधारपद सोडले व रिकी भुई संघाचा कर्णधार झाला. मात्र यामागील खरे कारण आता समोर आले. “बंगालविरुद्धच्या सामन्यात अंतिम संघाचा भाग नसलेल्या एका खेळाडूला मी दटावले. मात्र त्याला दुखावले जाईल अशी कोणतीही वैयक्तिक टिप्पणी केली नाही. या खेळाडूचे वडील राजकीय नेते असल्याने त्यांनी थेट आंध्र प्रदेश क्रिकेट संघटनेशी संपर्क साधला. त्यानुसार संघटनेने मला कर्णधारपद सोडण्यास सांगितले. संघातील सर्व खेळाडू त्यावेळी उपस्थित होते. मी कोणताही गैर शब्द वापरलेला नाही,” असे विहारी म्हणाला.

भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूपेक्षा आंध्र प्रदेश संघटनेला तो खेळाडू महत्त्वाचा वाटत असेल. अथवा त्यांना एखाद्याच्या सागंण्यावरून अन्य खेळाडूच्या कारकीर्दीचा निर्णय घ्यायचा असेल. तर मी यापुढे कधीही आंध्र प्रदेशसाठी खेळणार नाही, असेही विहारीने नमूद केले.

कोण आहे तो खेळाडू?

विहारीने आरोप केलेल्या त्या खेळाडूचे नाव के. एन. पृथ्वी राज असे आहे. त्याने स्वत: इन्स्टाग्रामवर याविषयी माहिती देत विहारीने केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, असे सांगितले. विहारीने माझ्याशी अर्वाच्च भाषेत संवाद केला. तसेच शिवीगाळ केली. माझ्यासाठी आत्मसम्मान सर्वात महत्त्वाचा आहे. मी कोणाचेही नाव वापरून काहीही केलेले नाही. संघातील अन्य खेळाडूंना याविषयी सर्व माहीत आहे,” असे पृथ्वी राज म्हणाला.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश