आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून रोमेलू लुकाकूची निवृत्ती; १३५ सामन्यांत ९४ गोल करण्याचा विक्रम 
क्रीडा

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून रोमेलू लुकाकूची निवृत्ती; १३५ सामन्यांत ९४ गोल करण्याचा विक्रम

बेल्जियमचा आघाडीचा फुटबॉलपटू रोमेलू लुकाकू याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. यासह बेल्जियमच्या राष्ट्रीय संघातील त्याच्या १६ वर्षांच्या कारकीर्दीचा शेवट झाला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : बेल्जियमचा आघाडीचा फुटबॉलपटू रोमेलू लुकाकू याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. यासह बेल्जियमच्या राष्ट्रीय संघातील त्याच्या १६ वर्षांच्या कारकीर्दीचा शेवट झाला आहे.

लुकाकू हा बेल्जियमच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू आहे. त्याने १३५ सामने खेळताना ९४ गोल केले. केविन डी ब्रुयने याने ४१ गोल करून बेल्जियमकडून दुसरा क्रमांक पटकावला आहे.

ऑक्टोबरमध्ये लुकाकू बेल्जियमकडून अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात बेल्जियमचा फ्रान्सने १-४ असा पराभव केला होता. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये लुकाकूपेक्षा अधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (१४६), अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (१२६), इराणचा अली दाई (१०८) आणि भारताचा सुनील छेत्री (९५) यांचा समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबईत मलेरियाचा उद्रेक; नऊ महिन्यांत साडेबारा हजार जणांना लागण; हिवतापमुक्त शहराचे आव्हान कायम

लातूर जिल्हा बँकेवर देशमुख घराण्याचा झेंडा; धीरज देशमुखांच्या पॅनेलने जिंकल्या १४ जागा

Mumbai : नॉन-सेस इमारतींनाही इन्सेंटिव्ह FSI; मिश्र पुनर्विकास प्रकल्पाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय

अजित पवार यांची कार्यपद्धती थक्क करणारी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गौरवोद्गार

Ajit Pawar Death: विमान अपघात चौकशी अहवाल लवकर प्रसिद्ध करा - मुख्यमंत्री