PTI
क्रीडा

रूट, ॲटकिन्सनचा शतकी तडाखा, इंग्लंडच्या ४२७ धावा; श्रीलंकेची ८ बाद १८३ अशी स्थिती

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर जो रूटने (२०६ चेंडूंत १४३ धावा) पुन्हा एकदा शतकी नजराणा सादर केला.

Swapnil S

लॉर्ड्स : क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर जो रूटने (२०६ चेंडूंत १४३ धावा) पुन्हा एकदा शतकी नजराणा सादर केला. त्याला आठव्या क्रमांकावरील गस ॲटकिन्सनच्या (११५ चेंडूंत ११८ धावा) कारकीर्दीतील पहिल्या शतकाची सुरेख साथ लाभली. त्यामुळे इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात १०२ षटकांत ४२७ धावांपर्यंत मजल मारली.

या कसोटीतील दुसऱ्या दिवशी अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा श्रीलंकेची पहिल्या डावात ५४ षटकांत ८ बाद १८३ अशी स्थिती होती. कामिंदू मेंडिस झुंजार अर्धशतकासह ६२ धावांवर नाबाद होता. मात्र वेगवान चौकडीसमोर श्रीलंकेचे अन्य फलंदाज ढेपाळले. अँजेलो मॅथ्यूज (२२), दिमुथ करुणारत्ने (७), पथुम निसांका (१२), धनंजय डीसिल्व्हा (०) यांनी निराशा केली. त्यामुळे श्रीलंका संघावर फॉलो-ऑनचे सावट आहे.

तत्पूर्वी, रूटने कसोटी कारकीर्दीतील ३३वे शतक साकारताना १८ चौकार लगावले. त्याने ॲटकिन्सनसह सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भर घातली. रूट बाद झाल्यावर ॲटकिन्सनने आक्रमक फलंदाजी करताना १४ चौकार व ४ षटकारांसह चौथ्याच कसोटीत शतक झळकावण्याचा पराक्रम केला. श्रीलंकेसाठी असिथा फर्नांडोने ५ बळी मिळवले.

> जो रूटने ३३वे कसोटी शतक साकारले. याबरोबरच इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले. ॲलिस्टर कूकने १६१ कसोटींत ३३, तर रूटने १४५ कसोटींमध्ये ३३ शतके केली आहेत.

Pune : जेजुरीत दिंडीच्या ट्रकची वारकऱ्यांना धडक; तीन महिलांचा मृत्यू, चार गंभीर जखमी

'जव्हार' ठरला १०० टक्के तंबाखूमुक्त शाळांचा पहिला तालुका; सर्व २६८ शाळांना तंबाखूमुक्त प्रमाणपत्र; व्यसनमुक्त समाजाकडे ऐतिहासिक पाऊल

'श्रीलंका' ठरले भारतीय लग्नांचे नवे हॉटस्पॉट; पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम; लोकप्रियतेत २५ टक्क्यांची वाढ

अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजय वैती अपात्र; खोटी माहिती देऊन निवडणूक लढवल्याचा ठपका

संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी फलटण सज्ज; वीज व पालखी तळावरील सुविधांची जय्यत तयारी