क्रीडा

दुलीप क्रिकेट ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाच्या संघात ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वालची निवड

भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जात असून 12 जुलैपासून डॉमिनिका येथे पहिली कसोटी सुरू होणार

नवशक्ती Web Desk

आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या दोन्ही सलामीवीरांची 28 जूनपासून सुरू होणाऱ्या दुलीप क्रिकेट ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाच्या संघात निवड झाली आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जात असून 12 जुलैपासून डॉमिनिका येथे पहिली कसोटी सुरू होणार आहे. दोन्ही संघामध्ये दुसरी कसोटी २० ते २४ जुलै दरम्यान खेळवली जाणार आहे. दुलीप करंडक स्पर्धा २८ जून ते १६ जुलै या कालावधीत होणार आहे. ऋतुराज आणि यशस्वी या दोघांची पश्चिम विभागाच्या संघात निवड झाली असल्याने त्यांची निवड भारताच्या कसोटी संघात होण्याची शक्यता नाही.

आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि सर्फराज खानला संधी देण्यात आली आहे. दोघांनाही पश्चिम विभागाच्या संघात स्थान देण्यात आले आहे. मुंबईतील शम्स मुलाणीचीही निवड झाली आहे. प्रियांक पांचाळ यांच्याकडे पश्चिम विभागाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

रेमंड ग्रुपचे माजी अध्यक्ष विजयपत सिंघानिया अनंतात विलीन; पुत्र गौतम सिंघानिया यांनी दिला मुखाग्नी

प्रवाशांसाठी खुशखबर! नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० पेक्षा जास्त फ्लाइट्स सुरू; देशभरात कनेक्टिव्हिटी वाढणार

Mumbai : गॅस सेवांच्या नावाखाली सायबर फसवणूक; APK फाइलने काही मिनिटांत बँक खाती रिकामी, काय काळजी घ्यावी?

Maharashtra Weather Update : राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

ठाणे जिल्ह्यात प्रति कुटुंब तीन लिटर रॉकेल; ग्रामीण भागासाठी रॉकेलचा कोटा मंजूर