क्रीडा

माजी क्रिकेटपटू शिखर धवन आणि गर्लफ्रेंड सोफी शाइनचा साखरपुडा; इंस्टाग्रामवर खास पोस्ट करत म्हणाला, "आयुष्यभरासाठी...

काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असलेले शिखर धवन आणि सोफी शाइन यांनी मे २०२५ मध्ये अधिकृतपणे आपले नाते जाहीर केले होते. त्यानंतर २०२६ च्या सुरुवातीलाच त्यांनी साखरपुडा केला.

किशोरी घायवट-उबाळे

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन याने आपल्या आयुष्यातील नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. धवनने सोमवारी (दि. १२) त्याची दीर्घकाळापासूनची गर्लफ्रेंड सोफी शाइनसोबत साखरपुडा उरकला. अधिकृत इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत धवनने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

आयुष्यभरासाठी एकत्र...

“एकत्र हसण्यापासून ते एकत्र स्वप्न पाहण्यापर्यंतचा हा प्रवास. साखरपुड्यासाठी मिळालेल्या प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मनापासून कृतज्ञ आहे. आता आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी भावनिक पोस्ट धवनने इंस्टाग्रामवर केली आहे.

दुबईत ओळख, मैत्रीतून प्रेम

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत असलेले शिखर धवन आणि सोफी शाइन यांनी मे २०२५ मध्ये अधिकृतपणे आपले नाते जाहीर केले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ दरम्यान दोघे एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. काही वर्षांपूर्वी दुबईत त्यांची ओळख झाली आणि मैत्रीतून हे नाते हळूहळू प्रेमात रूपांतरित झाले.

सामाजिक कार्यात सक्रिय

आयरिश नागरिक असलेली सोफी शाइन ही उच्चशिक्षित असून तिने लिमरिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती अबूधाबीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. व्यावसायिक कारकिर्दीबरोबरच ती सामाजिक कार्यातही सक्रिय असून शिखर धवन फाउंडेशनची प्रमुख म्हणून काम पाहते. या फाउंडेशनच्या माध्यमातून क्रीडा आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.

शिखर धवनचा दुसरा विवाह

या साखरपुड्यानंतर शिखर धवनचा लवकरच विवाह होणार असून, हा त्याचा दुसरा विवाह असणार आहे. यापूर्वी त्याचा विवाह आयेशा मुखर्जी यांच्याशी झाला होता. २०२३ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. धवनला एक मुलगा असून त्याचे नाव झोरावर (Zoravar Dhawan) असे आहे.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल