Photo : X (@cricbuzz)
क्रीडा

श्रेयसची पाठदुखीमुळे क्रिकेटपासून विश्रांती

भारताचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरने पाठदुखीमुळे लाल चेंडूने होणाऱ्या सामन्यांतून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रेयस मुंबईचे प्रतिनिधित्व करेल की नाही, याविषयी साशंका आहे.

Swapnil S

मुंबई : भारताचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरने पाठदुखीमुळे लाल चेंडूने होणाऱ्या सामन्यांतून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रेयस मुंबईचे प्रतिनिधित्व करेल की नाही, याविषयी साशंका आहे.

३० वर्षीय श्रेयस हा ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध सुरू असलेल्या चार दिवसीय कसोटी मालिकेत भारत-अ संघाचा कर्णधार होता. मात्र पहिल्या लढतीत भारत-अ संघाचे नेतृत्व केल्यानंतर श्रेयसने मंगळवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या सामन्यातून माघार घेतली. त्यामुळे श्रेयसविषयी प्रश्न विचारण्यात आले. अखेर बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीमुळे श्रेयसनेच स्वत:हून विश्रांती मागितल्याचे स्पष्ट झाले.

“वैयक्तिक कारणास्तव आपण मुंबईत परत जात असल्याचे श्रेयसने भारत-अ संघाच्या व्यवस्थापनाला कळवले. मात्र त्याने राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांना पत्राद्वारे अधिकृतपणे कळवले असून ठराविक काळासाठी आपण प्रथम श्रेणी क्रिकेटमधून (लाल चेंडूचे सामने) विश्रांती घेत असल्याचे त्यात नमूद केले आहे,” असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

श्रेयसने भारताच्या कसोटी व टी-२० संघातील स्थान आधीच गमावले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही तो भारतीय संघाचा भाग नसेल, हे स्पष्ट आहे. आता १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी स्पर्धेत श्रेयस मुंबई संघाचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे. मात्र पाठदुखीने यापूर्वीही श्रेयसला सतावले असून तो आता कधी पुनरागमन करणार, हे पाहणे रंजक ठरेल.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय : सर्व स्मार्टफोनमध्ये ‘संचार साथी’ ॲप अनिवार्य; सायबर फसवणुकीवर लगाम

"काँटनेवाले अंदर बैठे हैं"; संसदेत श्वान आणणाऱ्या खासदार रेणुका चौधरींचा सरकारवर निशाणा, भाजपकडून कारवाईची मागणी

मुंबईत पुन्हा हाय अलर्ट! २ शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

ठाणे ते दक्षिण मुंबई अवघ्या ३० मिनिटांत! MMRDA कडून एलिव्हेटेड ईस्टर्न फ्रीवे एक्स्टेंशनच्या कामाला सुरुवात

'उतावीळ लोकं, उतावीळ कामं'! समांथाने राज निदिमोरूशी 'गुपचूप' केलं लग्न; दिग्दर्शकाच्या पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत