क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात आयर्लंडवर विजय

आफ्रिकेने दिलेल्या २१२ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने २० षटकांत ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली

वृत्तसंस्था

सलामीवीर रीझा हेंड्रिक्स (५३ चेंडूंत ७४ धावा) आणि एडिन मार्करम (२७ चेंडूंत ५६) यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात आयर्लंडवर २१ धावांनी विजय मिळवला.

आफ्रिकेने दिलेल्या २१२ धावांचा पाठलाग करताना आयर्लंडने २० षटकांत ९ बाद १९० धावांपर्यंत मजल मारली. या विजयासह आफ्रिकेने दोन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. लॉर्कन टकर (३८ चेंडूंत ७८) आणि जॉर्ज डॉकरेल (२८ चेंडूंत ४३) यांनी आयर्लंडकडून कडवी झुंज दिली. परंतु तबरेझ शम्सी आणि केशव महाराज या फिरकीपटूंनी प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद करून आफ्रिकेचा विजय साकारला. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ट्रिस्टियन स्ट्रब्स (२४), ड्वेन प्रिटोरियस (नाबाद २१) यांनीही उपयुक्त योगदान दिल्यामुळे आफ्रिकेने ५ बाद २११ धावांचा डोंगर उभारला.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

एकनाथ शिंदे अडचणीत; बेकायदा इमारतींना अभय दिल्याचा आरोप, उच्च न्यायालयात याचिका दाखल

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य