संग्रहित छायाचित्र 
क्रीडा

सुप्रीम कोर्टाचा राज्य कबड्डी असोसिएशन प्रशासक नियुक्तीबाबत महत्त्वपूर्ण आदेश

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या प्रशासक नियुक्तीबाबत नोटीस जारी करून आजच्या तारखेप्रमाणे स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे...

Swapnil S

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या प्रशासक नियुक्तीबाबत नोटीस जारी करून आजच्या तारखेप्रमाणे स्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे, माननीय मुंबई खंडपीठ, बॉम्बे उच्च न्यायालयाने नेमलेला प्रशासक आता पुढील आदेशापर्यंत पदभार स्वीकारू शकत नाही किंवा नव्या निवडणुका घेऊ शकत नाही.

उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेली विशेष परवानगी याचिका सोमिरन शर्मा, गणेश गाढे आणि अरुण फाजगे यांच्या माध्यमातून माननीय सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. प्रकरणाच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आजची स्थिती कायम ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला आहे.

सोमिरन शर्मा यांनी नमूद केले की, आजच्या तारखेपर्यंत प्रशासकांनी असोसिएशनचा पदभार स्वीकारलेला नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे आता प्रशासकांना पदभार स्वीकारण्यास किंवा कोणतीही निवडणूक प्रक्रिया राबविण्यास प्रतिबंध आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की, या निवडणुका राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेच्या अनुषंगानेच झालेल्या आहेत.

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा; शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदलला

‘ऑक्टोबर हिट’ने मुंबईकर घामाघूम! तापमान ३२; पण भास ४१चा... सोशल मीडियावर भावनांचा भडका