क्रीडा

यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये या खेळाडूला मिळाले सुवर्णपदक

वृत्तसंस्था

गुरुनैदू सनपतीने मॅक्सिकोमधील लेऑन शहरात झालेल्या यूथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकाविले. यूथ वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय वेटलिफ्टर ठरला.

या स्पर्धेत सौदी अरेबियाच्या अली माजीदने २२९ किलो वजन उचलत रौप्य, तर कझाकिस्तानच्या उमरोव्हने २२४ किलो वजन उतलत कांस्यपदक मिळविले. १६ वर्षांच्या गुरुनैदूने एकूण २३० किलो (१०४ किलो अधिक १२६ किलो) वजन उचलून मुलांच्या ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा मान मिळविला. सनपतीने २०२०मध्ये आशियाई युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळविले होते.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम