क्रीडा

चेस ऑलिम्पियाडमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात अनोखा सामना होणार

वृत्तसंस्था

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने रशियाला जागतिक स्तरावर वेगळे पाडण्याची मोहीम सुरू असताना आणि क्रीडा क्षेत्रातही रशियाच्या खेळाडूंवर ठिकठिकाणी बंदी घालण्यात येत असताना भारतात होणाऱ्या चेस ऑलिम्पियाडमध्ये एकमेकांविरुद्ध युद्धात उभ्या ठाकलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यात अनोखा सामना होणार आहे. ७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हे दोन देश एकमेकांच्या आमने-सामने येणार आहेत.

चेस ऑलिम्पियाड २०२२चे यजमानपद भारत भूषवित आहे. ही स्पर्धा फुटबॉल वर्ल्डकप, ऑलिम्पिक आणि वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपनंतरची सर्वात मोठी स्पर्धा आहे. तामिळनाडूतील महाबलीपुरम शहरात या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.

या चेस ऑलिम्पियाड दरम्यान १८०पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशनच्या प्रमुखांची निवड करणार आहेत. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फेडरेशन सध्याचे अध्यक्षपद हे रशियाचे माजी उपपंतप्रधान आरकेडी वोरकोविच यांच्याकडे आहे. यंदाच्या निवडणुकीत तेच सध्या आघाडीवर आहेत. ते जिंकले तर त्यांचा हा दुसरा कार्यकाळ असणार आहे. त्यांच्याविरुद्ध युक्रेनचे ग्रँडमास्टर अँडी बॅरीशपोलेट्स उभे आहेत. त्यांनी मे महिन्याच्या शेवटी आपली उमेदवारी घोषित केली होती. अध्यक्षपदासाठी अजून दोन उमेदवारदेखील रिंगणात आहेत. बचर कॉआटली ते सध्या एफआयडीईचे उपाध्यक्ष आहेत आणि बेल्जियमचे इनालबेक चेरिपोव हेही रिंगणात आहेत.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम