क्रीडा

भारतीय सायकलपटूच्या अंगावरून गेली प्रतिस्पर्धीची सायकल

महिलांच्या १० किलो मीटर ‘स्केच रन’ स्पर्धेदरम्यान मीनाक्षीला अपघात झाला.

वृत्तसंस्था

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सायकल ट्रॅकवर गेल्या चार दिवसांत दोन अपघात झाले. शर्यत सुरू असताना भारतीय सायकलपटू मीनाक्षीच्या अंगावरून प्रतिस्पर्धी खेळाडूची सायकल गेली.

महिलांच्या १० किलो मीटर ‘स्केच रन’ स्पर्धेदरम्यान मीनाक्षीला अपघात झाला. या अपघातात मीनाक्षी सायकलवरून घसरून ट्रॅकच्या कडेला पोहोचली. त्याचवेळी मागून येणारी न्यूझीलंडची सायकलपटू ब्रायोनी बोथाला आपला वेग नियंत्रित करता आला नाही. तिची सायकल मीनाक्षीच्या अंगावरून गेली. यानंतर बोथाही सायकलवरून खाली पडली.

अपघात होताच डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही सायकलपटूंना ट्रॅकमधून बाहेर नेले. मीनाक्षीला स्ट्रेचरवर नेण्यात आले. मीनाक्षीच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हरियाणाची रहिवासी असलेल्या मीनाक्षीने २०१९मध्ये सायकल चालविण्यास सुरुवात केली होती. त्यावर्षी झालेल्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत तिने शानदार कामगिरी केली होती. सर्वोत्तम कामगिरीमुळे तिची २०२०मध्ये भारतीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली.

यावर्षी तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.

Mumbai Local Train Update : कल्याण-बदलापूर मार्गिका २०२८ मध्ये; बोरिवली-विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम ३०% पूर्ण

Mumbai: चर्चगेटच्या आयकर भवनात भीषण आग; अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, VIDEO

Pune : खर्च भागेना म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव! रडतानाचा VIDEO पाठवून कुटुंबीयांकडून मागितले ५ लाख

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO

महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित