क्रीडा

ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धा १६ ऑगस्टला होणार

१८ सप्टेंबर २०२२पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत एफसी गोवा संघ तिसऱ्यांदा सहभागी होत आहे.

वृत्तसंस्था

यंदाच्या १३१ व्या ड्युरँड चषक फुटबॉल स्पर्धेत १६ ऑगस्ट रोजी सलामीला गतविजेता एफसी गोवा संघाची लढत गेल्या वेळचा उपविजेता मोहमेडन स्पोर्टिंग क्लबशी होणार आहे.

१८ सप्टेंबर २०२२पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत एफसी गोवा संघ तिसऱ्यांदा सहभागी होत आहे. मागील हंगामात कमालीचे सातत्य राखत गोवा क्लबने जेतेपद पटकाविले होते.

या स्पर्धेत २० संघ खेळणार आहेत. मागील स्पर्धेच्या तुलनेत आणखी चार संघांची भर पडली आहे. आयएसएल अर्थात इंडियन सुपर लीगमधील सर्वच्या सर्व ११ फ्रँचायझी संघ यंदा सहभागी होणार आहेत. आय-लीग स्पर्धेतील पाच आणि सर्व्हिसेसच्या चार संघांचाही समावेश आहे.

गतविजेता एफसी गोवा क्लबचा अ गटात समावेश आहे. त्यांच्या गटात मोहमेडन एससी, बंगळुरू एफसी, आयएसएल विजेता जमशेदपूर एफसी आणि इंडियन एअर फोर्स असे तगडे संघ आहेत.

यंदाच्या ड्युरँड चषक स्पर्धेत एकूण ४७ सामने खेळवले जाणार आहेत. अ आणि ब गटातील सामने पश्चिम बंगाल येथे होतील. इम्फाळ आणि गुवाहाटी येथे क आणि ड गटातील सामने होणार आहेत. बाद फेरीतील (नॉकआऊट फेरी) सर्व सात सामने पश्चिम बंगालमधील तीन ठिकाणांवर होतील. अंतिम सामना कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर (व्हीवायबीके) १८ सप्टेंबर रोजी नियोजित करण्यात आला आहे.

दरम्यान, ऐतिहासिक फुटबॉल स्पर्धा असलेल्या ड्युरँड चषक स्पर्धेच्या गोवा येथील टूरला गतविजेता एफसी गोवा क्लबच्या होमग्राऊंडवरून दिमाखात सुरुवात झाली. ड्युरँड ट्रॉफी टूरचे गोवा हे शेवटचे ठिकाण आहे. पाच शहरांतून गोवा येथे पोहोचलेल्या टूरला कोलकाता येथून हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यानंतर ही टूर गुवाहाटी, इम्फाळ आणि जयपूर मार्गे गोवा येथे दाखल झाली. गोवा येथील दोन दिवसांच्या मुक्कामानंतर ड्युरँड चषक ट्रॉफी टूर ही स्पर्धेच्या मुख्य ठिकाणी कोलकाता येथे परतणार आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री