क्रीडा

ऑक्टोबरमध्ये खो-खोची पहिली अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्याची शक्यता

ऋषिकेश बामणे

अल्टिमेट खो-खो लीगच्या आयोजनानंतर आता भारतीय खो-खो महासंघ (केकेएफआय) खेळाच्या प्रसारासाठी अधिक उपक्रम राबवणार आहेत. ऑक्टोबरमध्ये खो-खोची पहिलीवहिली जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात येण्याची शक्यता असून नवी दिल्ली किंवा गुजरात येथे ही स्पर्धा खेळवण्यात येईल, अशी माहिती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

बालेवाडी (पुणे), येथे सध्या अल्टिमेट लीग सुरू असून महासंघ हीच संधी साधून खो-खो जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक स्पर्धेत २५ संघांचा समावेश होण्याची शक्यता आहे. यामध्ये भारतासह पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या संघांचा समावेश असून स्पर्धेच्या तारखा आणि वेळापत्रक याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल.

जागतिक स्पर्धेपूर्वी आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. २०२६च्या आशियाई स्पर्धेत खो-खोचा समावेश व्हावा, यासाठी महासंघ प्रयत्नशील असून पुढील महिन्यात महासंघाच्या पदाधिकारींची बैठक होणार आहे.

दरम्यान, खो-खोची जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याने खो-खोचा विश्वचषक पूर्णपणे वेगळा खेळवण्यात येणार का, असा प्रश्न उद्भवला आहे. गत‌वर्षी डिसेंबरमध्ये विश्वचषक आयोजित करण्याविषयी घोषणा करण्यात आली होती. राजस्थानमध्ये मार्च महिन्यात विश्वचषक आयोजित होणे अपेक्षित होते. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

विभवकुमारने केली लाथाबुक्क्यांनी मारहाण; स्वाती मालीवाल यांनी नोंदविला 'एफआयआर'

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

छगन भुजबळ नाराज; प्रचारात फारसे सक्रिय नसल्याने चर्चांना उधाण

सिंचन घोटाळ्यात तथ्य, मात्र अजितदादा दोषी नाहीत - फडणवीस