@PJMishra121110
क्रीडा

भारताचा लाजिरवाणा विक्रम इंग्लंडच्या नावावर; दुसऱ्या वनडेतील पराभवानंतर 'नकोशा' रेकॉर्डला गवसणी

भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रविवारी दारुण पराभव झाल्यानंतर इंग्लंडने 'नकोशा' विक्रमाला गवसणी घातली आहे.

Krantee V. Kale

भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रविवारी दारुण पराभव झाल्यानंतर इंग्लंडने 'नकोशा' विक्रमाला गवसणी घातली आहे. एकदिवसीय सामन्यात ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करूनही सर्वात जास्तवेळेस म्हणजेच तब्बल २८ वेळेस पराभवाचे तोंड बघावे लागणारा इंग्लंड हा एकमेव संघ ठरलाय.

इंग्लंडने आतापर्यंत ९९ सामन्यांमध्ये ३०० धावांचा आकडा पार केलाय. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी हा लाजिरवाणा विक्रम भारतासह इंग्लंडच्या नावावर होता. १३६ सामन्यांत ३०० धावांचा टप्पा ओलांडूनही भारताला २६ वेळेस परभव चाखायला लागला आहे. तर, रविवारच्या सामन्यातील पराभवामुळे इंग्लंडवर २८ व्यांदा ही नामुष्की आली.

या यादीत वेस्ट इंडीज ६२ सामन्यांमध्ये २७ पराभवांसह तीसऱ्या स्थानी तर ८७ सामन्यांमध्ये १९ पराभवांसह श्रीलंका चौथ्या क्रमांकावर आहे.

एकदिवसीय सामन्यांत ३०० हून जास्त वर धावा केल्यानंतर सर्वाधिक पराभव होणाऱ्या संघांची यादी

इंग्लंड - २८ पराभव (९९ सामने)

भारत - २७ पराभव (१३६ सामने)

वेस्ट इंडीज - २३ पराभव (६२ सामने)

श्रीलंका - १९ पराभव (८७ सामने)

दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने दिलेल्या ३०५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने धडाकेबाज सुरुवात करत कर्णधार रोहित शर्माचा शतकी तडाखा आणि त्यापूर्वी रवींद्र जडेजाची गोलंदाजीतील मॅजिक या बळावर इंग्लंडला ४ विकेट आणि ३३ चेंडू राखून धूळ चारली. या विजयामुळे ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या