क्रीडा

US Open 2025 : सिनर चौथ्या फेरीत; झ्वेरेव्हचे आव्हान संपुष्टात

इटलीचा गतविजेता तसेच अग्रमानांकित यॅनिक सिनरने रविवारी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची (यूएस ओपन) चौथी फेरी गाठली. मात्र जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

Swapnil S

न्यूयॉर्क : इटलीचा गतविजेता तसेच अग्रमानांकित यॅनिक सिनरने रविवारी अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची (यूएस ओपन) चौथी फेरी गाठली. मात्र जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

वर्षातील शेवटची ग्रँडस्लॅम स्पर्धा म्हणून यूएस ओपनला ओळखले जाते. हार्ड कोर्टवर खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेला अन्य ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या तुलनेत तितकेच महत्त्व असते. २०२४मध्ये पुरुष एकेरीत इटलीचा यानिक सिनर, तर महिलांमध्ये बेलारूसच्या आर्यना सबालेंकाने विजेतेपद मिळवले होते. आता यावेळी २०२५मध्ये कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरेल.

पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत सिनरने २७व्या मानांकित डेनिस शापोवालोव्हला ५-७, ६-४, ६-३, ६-३ असे चार सेटमध्ये पराभूत केले. २५व्या मानांकित फेलिस ऑगरने मात्र झ्वेरेव्हवर ४-६, ७-६ (९-७), ६-४, ६-४ अशी पिछाडीवरून मात केली. तसेच स्टेफानोस त्सित्सिपासही पराभूत झाला.

पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णा व अर्जुन कढे यांना मात्र आपापल्या सहकाऱ्यासह खेळताना पराभव पत्करावा लागला.

GST ५ आणि १८%; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा