क्रीडा

विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांनी केलं बेन स्टोक्सचं कौतूक, म्हणाले...

नवशक्ती Web Desk

अॅशेस मालिकेत इंग्लंड संघाला सगल सुसऱ्या पराभवाला सलग सुसऱ्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. लॉर्डवर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियाकडून ४३ धावांनी पराभव पत्कारावा लागला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने १५५ धावांची कामगिरी केली. त्याने केलेल्या फलंदाचीचं सर्वत्र कौतूक केलं जात आहे. विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ या दोन महान खेळाडूंनी देखील बेन स्टोक्सच्या कामगिरीचे तोंड भरुन कौतूक केलं आहे.

विरा कोहलीने ट्विट करत स्टोक्सचे कौतू केले असून ऑस्ट्रेलियाचा संघ चांगला असल्याचं म्हटलं आहे. विराटला स्टोक्सबद्दल बोललेलं एक जुनं वाक्य आठवलं. "मी विनोदाने बेन स्टोक्सला माझ्याविरुद्ध खेळलेला सर्वात चांगला प्रतिस्पर्धी खेळाडू म्हटलं नव्हतं. सर्वोच्च दर्जाचीखेली पण सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ खूप चांगला आहे." असं त्याने म्हटलं आहे. तसंच त्याने अनेकदा स्टोक्सचं कौतूक केलं आहे. विराटला त्याचा आरसीबी संघात स्टोक्सला सामील करायचे होते.

बेन स्टोक्सविरोद्ध खेळणाऱ्या स्टीव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियन खेळाडूने देखील त्याचं कौतूक केलं आहे. स्टोक्स हा अविश्वसनीय खेळाडू असून त्याने अनेक अविश्वसनीय गोष्टी केल्याचं स्टीव्ह स्मिथ म्हणाला. "त्याने या मैदानावर वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये काही अविश्वसनीय गोष्टी केल्या आहेत. तो शॉर्ट एंडला टार्गेृट क रत होता. त्याने दुसऱ्या टोकाला पहिला शॉट खेळला आणि तो बाद झाला." अशं स्मिथ म्हणाला आहे. स्टोक्स बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतत असताना केवळ इंग्लंडचेच नाही तर ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षकही त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत होते.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत