X
क्रीडा

वानखेडेवर आज भारतीय क्रिकेटमधील चार दिग्गजांचा सन्मान; रवी शास्त्री स्टँडचे लोकार्पणही होणार

मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील या चार दिग्गजांच्या बहुमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अनावरण सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.

Krantee V. Kale

मुंबई : वानखेडे स्टेडियमवर गुरुवार, ९ एप्रिल रोजी भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांचा गौरव करण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीआय) माजी भारतीय कर्णधार रवी शास्त्री यांच्या नावाच्या स्टँडचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याच सोहळ्यात माजी क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर आणि डायना एडल्जी यांच्या नावाने स्टेडियमची प्रवेशद्वारे समर्पित केली जाणार आहेत.

मुंबई आणि भारतीय क्रिकेटमधील या चार दिग्गजांच्या बहुमूल्य योगदानाचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अनावरण सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक, अपेक्स कौन्सिलचे सदस्य आणि क्रिकेट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या महान खेळाडूंचा सन्मान करण्याचा निर्णय एमसीए अपेक्स कौन्सिलने फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत घेतला होता.

वानखेडे स्टेडियमवरील प्रेस बॉक्सच्या खालील पहिल्या स्तरावरील (लेव्हल १) स्टँडला रवी शास्त्री यांचे नाव देण्यात येणार आहे. शास्त्री यांनी खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून मुंबई आणि भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच गेट क्रमांक ३ चे ‘दिलीप सरदेसाई गेट’, गेट क्रमांक ५ चे ‘डायना एडल्जी गेट’ आणि गेट क्रमांक ६ चे ‘एकनाथ सोलकर गेट’ असे नामकरण केले जाईल.

हा सोहळा मुंबई क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण असून या माध्यमातून आगामी पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला. आपल्या समृद्ध वारशाचे जतन आणि खेळाच्या भविष्यासाठी भक्कम पाया रचण्यासाठी ही महत्त्वाची पावले असल्याचे त्यांनी नमूद केले.

एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांचे जून २०२४मध्ये अचानक निधन झाल्यामुळे त्यावेळी सचिव पदावर कार्यरत असलेले अजिंक्य निवडणुकीत विजयी होत अध्यक्षपदी विराजमान झाले. तेव्हापासून त्यांच्या कार्यकाळात विविध उपक्रम एमसीएने राबवले आहेत.

दोन आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचे यशस्वी नेतृत्व करणारा मुंबईकर क्रिकेटपटू रोहित शर्मा याच्या नावे स्टैंड, माजी क्रिकेटपटूंचे विविध प्रवेशद्वारांना नाव, तसेच महिलांसाठी टी-२० मुंबई लीगची संलग्न क्लब्सला प्रत्येक सामन्यासाठी दिले जाणारे मानधन, शालेय वयोगटातील मुलांसाठी विशेष रेल्वे पासची सुविधा, क्रीडा पत्रकारांसाठी 'ऑनर्स बोर्ड', शरद पवार क्रिकेट संग्रहालय. ही यांपैकी काही उदाहरणे.

दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले असून यावेळी भारताच्या टी-२० विश्वचषक विजेत्या सूर्यकुमार यादवचा गौरवही होणार असल्याचे समजते.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली; शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

Mumbai : ३१ मे पर्यंत १०० टक्के नालेसफाई पूर्ण करा! पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे निर्देश

भोंदू अशोक खरात प्रकरण : अश्लील व्हिडिओ व्हायरल करणे महागात, गुन्हा दाखल

कोकणातील कातळशिल्पांवर बनणार आंतरराष्ट्रीय माहितीपट; सरकारकडून १४.५० कोटींच्या निधीला मान्यता

व्याज दर तूर्त स्थिर; RBI चे 'वेट अँड वॉच' धोरण; GDP ६.९ टक्के, महागाई दर ४.६ टक्के राहण्याचा अंदाज