क्रीडा

वेस्ट इंडिजच्या सलामीवीरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा

वृत्तसंस्था

दिनेश रामदिन पाठोपाठ वेस्ट इंडिजचा सलामीवीर लेंडल सिमन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.

लेंडल सिमन्सने २०००६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सिमन्सने वेस्ट इंडिजसाठी ६८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३१.५८च्या सरासरीने १,९५८ धावा केल्या. त्यात दोन शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. सिमन्सची कसोटी कारकीर्द फारशी चांगली नव्हती तो ८ सामन्यांत १७.३७च्या सरासरीने केवळ २७८ धावा करू शकला. सिमन्सने वेस्ट इंडिजसाठी ६८ टी-२० सामने खेळले, ज्यामध्ये त्याने २६.७८च्या सरासरीने १,५२७ धावा केल्या. सिमन्सने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ अर्धशतके झळकावली आहेत.

आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर, मुंबई इंडियन्सकडून खेळताना सिमन्सने २९ सामन्यात ३९.९६च्या सरासरीने १,०७९ धावा केल्या आहेत.

आयपीएल २०१४मध्ये त्याची कामगिरी अप्रतिम राहिली होती. त्यादरम्यान सिमन्सने १३ सामन्यांत ५६.२८च्या सरासरीने ३९४ धावा केल्या होत्या. २०१४च्या आयपीएलमध्येही त्याने शतक केले होते.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम