ANI
क्रीडा

विंडीजची मालिकेत विजयी आघाडी, दक्षिण आफ्रिकेवर ३० धावांनी मात; शेफर्डची भेदक गोलंदाजी

वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिका: ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना विंडीजने २० षटकांत ६ बाद १७९ अशी धावसंख्या उभारली.

Swapnil S

तारौबा : मध्यमगती गोलंदाज रोमारिओ शेफर्डने (१५ धावांत ३ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्याच्या बळावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ३० धावांनी पराभूत केले. याबरोबरच विंडीजने तीन लढतींच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करताना विंडीजने २० षटकांत ६ बाद १७९ अशी धावसंख्या उभारली. शाय होप (२२ चेंडूंत ४१ धावा), कर्णधार रोवमन पॉवेल (२२ चेंडूंत ३५) आणि शर्फेन रुदरफोर्ड (१८ चेंडूंत २९) यांनी उपयुक्त फटकेबाजी केली. शेफर्डने नाबाद ९ धावा केल्या. लिझाड विल्यम्सने तीन बळी मिळवले.

त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ १९.४ षटकांत १४९ धावांत गारद झाला. एकवेळ १४ षटकांत ३ बाद १२९ अशा सुस्थितीत असताना आफ्रिकेची फलंदाजी दडपणाखाली ढेपाळली. रीझा हेंड्रिक्सने १८ चेंडूंत ४४ धावा फटकावल्या. शेफर्डने हेंड्रिक्ससह कर्णधार एडीन मार्करम (१९), पॅट्रिक क्रुगर (६) यांचे बळी मिळवले. त्याला शामर जोसेफने तीन, तर अकील होसेनने दोन गडी टिपून उत्तम साथ दिली. शेफर्डच सामनावीर ठरला.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी