क्रीडा

अंतिम टी-20 सामन्यात मालिका कोण जिंकणार?

दोन्ही संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याने सामना अटीतटीचा होण्याची शक्यता

वृत्तसंस्था

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना रविवारी होत असून या सामन्यात मालिका कोण जिंकणार, याचा फैसला होणार आहे. दोन्ही संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार असल्याने सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे.

भारतीय संघाला अनेक उणिवा दूर करायच्या असल्या, तरी लागोपाठ विजय मिळवत त्यांनी मुसंडी मारल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावर मालिकेवर कब्जा करण्याची नामी संधी त्यांना चालून आली आहे. गेल्या आठ दिवसात भारताने चार सामने खेळले आहेत. त्यापैकी तिसऱ्या सामन्यात ४७ धावांनी, तर चौथ्या सामन्यात ८२ धावांनी विजय मिळविला आहे. दोन सामने गमावल्यानंतरही संघात फारसे बदल न करता हे दोन्ही विजय मोठ्या फरकाने मिळविलेले आहेत. मालिकेवर कब्जा करायचा असेल, तर अशाच मनोधैर्याने भारतीय संघाला खेळावे लागणार आहे.

भारताला घरच्या मैदानावरही अद्याप दक्षिण आफ्रिकेविरूध्दची टी-२० मालिका जिंकण्यात यश आलेले नाही. हे अपयश धुऊन काढण्याचा मोका टीम इंडियाला मिळाला आहे. गेल्या सामन्यात दिनेश कार्तिक अपेक्षांच्या कसोटीला पुरेपूर उतरला होता. हर्षल पटेल आणि आवेश खान यांनीही चमकदार कामगिरी केली होती. हे सातत्या त्यांना निर्णायक सामन्यात टिकवावे लागणार आहे.

भारत : ऋषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान. दक्षिण आफ्रिका : टेंबा बावुमा (कर्णधार), रीजा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस, रासी वॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेन्रिक्स क्लासेन, वेन पार्नेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, तबरेज शम्सी, एनरिच नॉर्त्जे, मार्को जानसेन.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

‘पुढील पंतप्रधान मराठीच’ या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा खुलासा; विविध मुद्द्यांवर भाष्य करत केंद्र सरकारवर हल्लाबोल

Thane : खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर मिळणार भरपाई; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेचा निर्णय, विशेष समितीची स्थापना

कॅमेरुन ग्रीनवर लागली २५.२० कोटी रुपयांची बोली; पण मिळणार 'इतकेच' कोटी

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?